कोरोना रुग्ण संख्येची वाढ मंदावली;नवे 11 रुग्ण तर एकाचा मृत्यू 27 जण कोरोना मुक्त
नांदेड/प्रतिनिधी
गेल्या आठवडाभरापासून झपाटयाने वाढत असलेल्या कोरोना रुग्ण वाडीला आज ब्रेक मिळाला आहे. गेल्या 24 तासात केवळ 11 रुग्णांची नोंद झाली असून यात एकाचा मृत्यू झाला तर 27 जण यशस्वी उपचार घेऊन कोरोना मुक्त झाल्याचे प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे.
गेल्या आठवडाभरापासून नांदेड जिल्ह्यात दररोज कोरोना रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ नोंदविली गेली आहे.संचार बंदी च्या आज तिसऱ्या दिवशी कोरोना रुग्णांची संख्या केवळ 11 ने वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 746 वर आलेली आहे.जिल्ह्यात आज 27 रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्यानंतर ते कोरोना मुक्त होऊन आपापल्या घरी परतले आहेत.ज्यामध्ये पंजाब भवन कोव्हिड सेंटर येथील 17 रुग्ण,बिलोली सेंटर मधील चार रुग्ण,किनवट येथील दोन रुग्ण,हादगाव सेंटरमधील एक रुग्ण,शंकराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयातील एक रुग्ण,जिल्हा रुग्णालयातील दोन रुग्ण असे एकूण 27 रुग्ण कोरोना मुक्त होऊन आपापल्या घरी परतले आहेत.
आज सकाळी वाजेगाव परिसरात राहणाऱ्या एका 63 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आज एकूण 11 कोरोना रुग्ण वाढल्याची नोंद झाली असून यामध्ये नांदेड शहरातील केवळ एक रुग्ण आहे.शहरातील वाजेगाव परिसरातील 40 वर्षीय पुरुष ,विकास नगर तालुका कंधार येथे 24 वर्षीय पुरुष ,सिद्धार्थ नगर तालुका किनवट येथील दोन रुग्ण आढळले असून यामध्ये 38 वर्षाचा पुरुष व 50 वर्षांची महिला आहे, भायेगाव रोड देगलूर येथील एक पुरुष 60 वर्षीय, गोजेगाव 29 वर्षीय पुरुष,बापूनगर दोन महिला 32 आणि 65 वर्षीय, मुखेड तालुक्यात 2 रुग्ण आढळले असून त्यामध्ये अशोक नगर 55 वर्षीय पुरुष,मुक्रमाबाद 44 वर्षीय पुरुष आणि लोहा येथील मोंडा परिसरात 72 वर्षीय महिला कोरोना बाधित झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या