Header Ads Widget

नांदेड जिल्ह्यात 40 कोरोना रुग्णांची वाढ,पाच कोरोना मुक्त तर एकाचा मृत्यू

नांदेड जिल्ह्यात 40 कोरोना रुग्णांची वाढ; पाच कोरोना मुक्त तर एकाचा मृत्यू

Coronavirus India: summary of the news for 13 May - AS.com

नांदेड/प्रतिनिधी
मागील 24 तासात नांदेड जिल्ह्यात नव्या 40 कोरोना रुग्णांची भर पडली आहे.आज 5 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.दरम्यान हिंगोली जिल्ह्यातील मंगळवार पेठ भागातील एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे.जिल्ह्यातील चौफेर क्षेत्रात दररोज नवनवीन कोरोना रुग्ण सापडत आहेत.सुरुवातीचे हे आकडे अत्यंत अल्प होते परंतु मागील आठवडाभरात या आकड्यांनी दिवसेंदिवस उचांक गाठायला सुरुवात केली आहे.

आज प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालानुसार जिल्ह्यात नव्याने 40 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये नांदेड शहरातील वजीराबाद भागातील 39 वर्षीय महिला,असर्जन येथील पद्मजा सिटी भागातील भागात 6 रुग्ण आढळून आले असून यामध्ये 36,38,44,52 वर्षाचे चार पुरुष 14 आणि 35 वर्षाच्या दोन महिलांचा समावेश आहे.

रहिम नगर भागातील 45 वर्षीय पुरुष,गणराज नगर भागात 45 वर्षीय पुरुष, गणिपुरा भागात 65 वर्षीय महिला,काबरा नगर भागात 24 वर्षीय पुरुष,हडको येथे 65 वर्षीय महिला.देगलूर येथील साधना नगर भागात एकूण सहा रुग्ण आढळले आहेत.

 यामध्ये 13,21 वर्षाची दोन पुरुष 10,17,29,65 वर्षाच्या चार महिलांचा समावेश आहे.किनवट तालुक्यातील किनवट येथे एक 30 वर्षीय पुरुष,कंधार तालुक्यातील इमाम वाडी भागात  25 वर्षीय महिला,फुलवर तालुका कंधार येथे 64 वर्षीय पुरुष,मुखेद तालुक्यातील मुक्रमाबाद मध्ये तीन रुग्ण आढळले असून ज्यामध्ये 31 वर्षीय पुरुष व 25 आणि 32 वर्षीय महिलांचा समावेश आहे,याच तालुक्यातील हसणाबाद येथे एक 24 वर्षीय महिला गोरक्षण गल्‍ली मुखेड येथे तीन रुग्ण आढळले असून यामध्ये 10 आणि 31 वर्षाचे दोन पुरुष आणि 65 वर्षीय महिला आहे.

नायगाव तालुक्यातील बालाजी गल्ली नरसी येथे दोन रुग्ण आढळले असून ज्यामध्ये 28 वर्षीय पुरुष व 22 वर्षीय महिला आहे.श्याम नगर तालुका नायगाव येथे चार रुग्ण आढळले असून त्यामध्ये 17,19 वर्षाचे दोन पुरुष 37,19 वर्षाच्या दोन महिलांचा समावेश आहे.हादगाव शहरात एक 35 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे.येथील गुजराती कॉलनी भागात दोन  83 वर्षीय पुरुष,पटेल नगर धर्माबाद परिसरात एक 38 वर्षीय पुरुष.ग्रामीण रुग्णालय धर्माबाद येथे 31 वर्षीय पुरुष,धर्माबाद शहरातील विठ्ठल मंदिर शिवाजीनगर भागात एक 65 वर्षीय पुरुष,परभणी जिल्ह्यातील गंगाखेड भागात 48 वर्षीय पुरुषावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहे.

काल रात्री हिंगोली जिल्ह्यातील मंगळवार पेठ येथील कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.आज प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालानुसार एकूण पाच कोरोना मुक्त झाले आहेत.3यामध्ये नांदेड येथील शासकीय रुग्णालयातील दोन रुग्ण,एका खाजगी रुग्णालयातील आणि नागपूर येथे संदर्भित झालेला एक रुग्ण असे एकूण पाच रुग्ण बरे झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
दरम्यान मंगळवारी रात्री मंगळवार पेठ हिंगोली येथील 45 वर्षीय कोरोना बाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.सदरील महिला ही नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उपचार घेत होती.

सदरील महिलेस उच्च रक्तदाब,मधुमेह असल्याने तिचा मृत्यू झाल्याचे या वैद्यकीय अहवालात म्हटले आहे.आजपर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 690 वर पोहचली आहे तर 264 रुग्णांवर औषधोपचार सुरू असून त्यातील 34 रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरूपाची असल्याचेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]