Header Ads Widget

सत्यशोधक:महात्मा जोतिराव फुले

सत्यशोधक:महात्मा जोतिराव फुले
विद्ये विना मती गेली। मती विना नीती गेली। 
नीती विना गती गेली।
गती विना वित्त गेले। वित्त विना शुद्र खचले। 
इतके अनर्थ अविद्येने केले। 
   -महात्मा जोतिराव फुले.
बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्य्र आणि सामाजिक परीस्थिती पाहून बहूजनाचे उध्दारक म.फुले यांनी वरील विवेचन केले. म.जोतिराव (तात्यासाहेब) फुले यांचा जन्म खतगुण येथील चिमणाबाई व गोविंदराव फुले या दामंपत्याच्या शेतकरी कुंटूबांत दि.11 एप्रिल 1827 रोजी झाला.आज त्यांची 193 वी जयंती.
जोतिराव फुले यांचे लग्न वयाच्या 13 व्या वर्षी बालवयातच क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्याशी झाला. तरूणवयातच म. फुले यांच्या वाचनात थॉमस पेन यांचे मानवी हक्कावरील पुस्तक वाचण्यात आले. त्या पुस्तकात प्रभाव त्याच्या जीवनावर कायमस्वरूपी राहीला. सामाजिक न्याया बाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. सामाजिक विषमाता, स्त्री-पुरूष भेदभाव मागासलेपण इत्यादी दूर करण्यासाठी त्यांनी काम सुरू केले. कोणणताही धर्म ईश्र्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुवर्ण्य जातीभेद हि निमीर्त्ती मानवाचीच आहे असे प्रखर मांडणी त्यांनी केली. नीती हीच मानवी जीवनाचा आधार आहे. हे तत्वचिंतन देखील त्यांचेच आहे. म. फुले यांच्या जीवनावर कबीरांच्या विचाराचा देखील प्रभाव दिसून येतो. लहानपणीच कबीराचे कबीरनामा हे पुस्तक देखील मनोगत झाले होते. नाना को एक गाय, एक रंग है दुध। तुम कैसे ब्राम्हण है कैसे सुद। म. फुले यांनी बहुजन समाज, शेतकरी व स्त्रीयाच्या प्रश्नावर लक्ष क्रेंद्रीत केले व या प्रश्नावरच शेवटपर्यंत लढत होते. पुणे येथे 1848 रोजी मुलींची शाळा काढून स्त्रीयांनी शिक्षण घेतले पाहीजे या करीता त्यांनी लागोपाठ मुलींच्या शाळा उघडल्या. सावित्रीबाईला सुरूवातीस शिक्षण देऊन नंतर त्यांना त्यांच्या शाळेत शिक्षीका म्हणून नेमले. म. फुले यांनी बालविवाह प्रथाला कडाडून विरोध करीत असतानाच विधवा विवाहाचे समर्थन केले आहे. हूंडाप्रथा (दहेज) अंधश्रध्दा इत्यादीवर कडाडून टिका टिपप्णी केली आहे. साधेपणाने लग्न लावले पाहिजे व लग्नावरील होणारा मोठा खर्च मुलीच्या व पाल्याच्या शिक्षणावर करण्यात यावा याकरीता त्यांनी साधे विवाह संस्कार पध्दतीने लग्न पुरोहिता शिवाय लावत व त्या विवाहास मुंबई कोर्टाने सुध्दा मान्यता दिली. गरीब आणि बहूजन समाजाला न्याय मिळविण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 ला केली. मानवाने गुण्या गोविंदाने राहावे असे त्यांचे मत होते. शेतक याचे आसुड या ग्रंथात शेतक याची विदारक परिस्थती व दुर्दशा आणि दारिद्य्राची दाहकता दाखविली आहे. हे पाहूनच ब्रिटीशाने शेती सुधारणा कायदा पारीत केला. मुलभूत मानवी हक्कांच्या आधारावरुन विश्र्वकुंटूब ही संकल्पना म. फुले यांनी विशद केली आणि करिता सार्वजनिक सत्यधर्म संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडली आहेत. स्त्री अथवा पुरूष या अभयतांनी अथवा सर्व स्त्रीयांनी अथवा एकमेंकात ऐकमेकांनी कोणत्याही प्रकारची आवड निवड (भेदभाव) न करता या पृथ्वीतलावर आपले एक कुंटूब समजून एकमताने सत्यवर्तन करून राहावे. आपल्या सर्वाच्या निर्मीकाने एकदंर सर्व प्राणि मात्रांना निर्माण करते वेळी मनुष्यास जन्मता:च स्वंतत्र्य प्राणि म्हणून निर्माण केले आहे. त्यास आपसात सार्‍या हक्काचा उपभोग घेण्यास समर्थ केले आहे. सर्वाच्या निर्माणकर्त्याने सर्व मानवी स्त्री-पुरूषास धर्म व राजकीय स्वंतत्रता दिली आहे. जो आपल्यापासून दुसर्‍या एखाद्या व्यक्तीस कोणत्याही तर्‍हेचे नुकसान देत नाही अथवा जो कोणी आपल्यावरुन दुसर्‍या मानवाचे हक्क समजून इतरांना पीडा देत नाही त्याला सत्यवर्तन करणारा म्हणावे. आपल्या सर्वच्या निर्मीकाने एकदंर सर्व स्त्री-पुरूषास एकदंर सर्व मानवी अधिकारांचे मुख्य धनी केले आहे. एखादा मानव अथवा काही मानवाची टोळी एखाद्या व्यक्तीवर जबरी करू शकत नाही, असे जबरी न करणार्‍यास सत्यवर्तन करणारे म्हणावे. एकंदर सर्व मानवी प्राण्यास पिढीजात कपटाने अषविय मानून त्यास नीच मानीत नाहीत त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे. स्त्री अथवा पुरूष जे शेती करतात त्यास सन्मान देणारेस सत्यवर्तनी समजावे. म. फुले यांच्या समतावदी दृष्टीकोणामुळे समाजाला एक नवी दिशा मिळाली म.फुले यांचे अनेक ग्रंथ प्रकाशीत झाले आहे. त्यातून ते दृष्टीस येते. गुलामगिरी, तृतीयरत्न, शेतकर्‍याचे आसूड, छत्रपती शिवाजी राजे यांचा पोवाडा इत्यादी ग्रंथातुन मानवाच्या उन्नतीचा व प्रगतीचा मार्ग दाखविला आहे. अशा मानवतावादी, समाजसुधारक, समाजसेवी लेखक, विचारवंत तथा सम्रग क्रांतीकारकांचा 193 व्या जयंती निमित्त महात्मा जोतीराव फुले यांना क्रांतीकार अभिवादन.
-प्रा.डॉ.लक्ष्मण पो.शिंदे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]