Header Ads Widget

थांबलेले अर्थार्जन आणि विस्कटलेली आर्थिक घडी

थांबलेले अर्थार्जन आणि विस्कटलेली आर्थिक घडी
निसर्ग आणि मानवाच्या रहाटगाडग्यात ऋतुचक्राप्रमाणे समग्र भूतलावर मानव व निसर्गाकडून वेगवेगळ्या प्रक्रिया अविरतपणे चालूच असतात. उदाहरणार्थ उन्हाळा, पावसाळा, हिवाळा किंवा अन्य कुठल्याही प्रक्रियेप्रमाणे मानवाला जगण्यासाठी व कायम त्याचे अस्तित्व राहण्यासाठी व ते  सदैव  टिकवून ठेवण्यासाठी अन्न, वस्त्र, निवारा या सारख्या प्रक्रिया निरंतर व अव्याहतपणे भूतलावर कार्यरत असतात. त्यातल्या कुठल्याही एखाद्या महत्त्वाच्या प्रक्रियेची गती मंदावली किंवा ठप्प झाली तर समग्र निसर्ग व मानवी जीवन अडचणीत व संकटात येऊन अपेक्षित हेतू किंवा उद्देश साध्य होण्याप्रती भूतलावरील संपुर्ण निसर्ग, मानव व प्राणी मात्राचे अतोनात नुकसान होऊन संपुर्ण जीव व त्यावर अवलंबून असलेल्या जीवनाचा मूळ पायाच ढासाळण्याच्या मार्गावर उभा असतो त्यामुळे म्हणावी तशी इमारत उभी राहू शकत नाही, ही जग रीतिचं आहे.
अशीच काहीशी परिस्थिती आज संपुर्ण जगभर कोरोना सारख्या संसर्गजन्य आजारामुळे झालेली आहे. हे आपण मागच्या तीन आठवड्या पासुन बघतो व प्रत्यक्ष अनुभवतो आहोत अशा या संसर्गजन्य आजाराच्या भीती व धास्तीमुळे संबंध जगाची अर्थिक घडी विस्कटीत होऊन अर्थाजनावर अवलंबून असलेले समग्र मानवी जीवन कांही काळासाठी का होईना पूर्णपणे थांबलेले आहे, जी मानव विकास प्रकतीयेतील फार मोठी बाधा आहे. जसे निसर्गाचे अस्तित्व सातात्याने कायम टिकून राहण्यासाठी व त्याच्या विकसीततेसाठी वेगवेगळ्या ऋतूमनाप्रमाणे त्यातील बदलाची ही तेवढीच गरज असते, तद्वतच भूतलावरील समग्र मानवाच्या अस्तित्व व विकसनशीलतेसाठी अन्न, वस्त्र, निवार्‍याप्रमाणे अर्थार्जनाचीही नितांत गरज असते जी मानवाला शेती किंवा विविध व्यवसाय व उद्योग धंद्याच्या निर्मिती व विकसित देवाण-घेवाण प्रक्रियेतूनच मानवाला दैनंदिन गरजा भागविण्यासाठी किंबहुना मानवाच्या विकसनशीलतेसाठी नेहेमीच गरजेची राहून उपयुक्त ठरते. म्हणून मानव विकासनशीलतेच्या प्रक्रियेत उभा राहू शकतो, अन्यथा त्याचे अस्तित्व नगण्यच असते. समजा एखादे मूल जन्माला आले व त्याचा म्हणावा तसा शारिरीक विकास झालाच नाही तर त्याच्या जन्माचे अस्तित्व श्यूण्यच असते, त्याच्या विकसनशील प्रक्रियेत गरज असते ती वेग वेगळ्या निसर्ग व मानव निर्मित संसाधन व उपायांची. दुसरे असे की एखादी नवी कोरी गाडी वर्षानुवर्षे घारा समोर वापरा अभावी उभी असेल तर त्याची योग्य देखभाल व दुरुस्ती केल्या शिवाय तिचा पुनर्वापर करणे अवघड असते. असेच निसर्ग व मानवी जीवनाचे जगणे व विकसित होणे ही प्रक्रिया देखील वास्तवच आहे. अशा कुठल्याही प्रक्रिया थांबणे किंवा बंद पडणे म्हणजे त्या उपयोगीतेसाठी बाधकच असतात. कोरोनाचा आजाराचे गांभीर्य लक्षात घेता जगातील समग्र मानवजातीची अवस्था अशीच काहीशी झाली आहे. मानवजातीच्या विकास व उत्थानात्मक प्रक्रियेत माझे पूर्व अनुभवानुसार अशी स्थिती आद्यपावेतो सर्वदूर बघण्यात आली नाही. आजार अनेक आहेत, आपत्तीही अनेक बघितल्या, पण त्याचे रूप व स्वरूप या सारखे व्यापक व गंभीर इतर आजारांप्रमाणे कधी वाटलेच नाही. आमचा या व्यापाकते व गंभीरतेबद्दलचा समज व कयास काहीसा वेगळाच असल्याचे सध्याच्या लॉकडाउनमुळे दिसत आहे. मागील संकटाच्या प्रचिती व अनुभवावरून या आजाराच्या संसर्गतेमुळे व सध्या ठोस वैद्यकीय उपाय व उपचार पद्धती उपलब्ध नसल्यामुळे मानवी मनावर एक वेगळेच मानसिक दडपण असून या बद्दलची भीतीयुक्त मानसिकता दूर करून निश्चित स्वरूपाने ठोस उपाय योजनेची नितांत गरज वाटत असल्याचे सर्वदूर मत आहे. समग्र मानवजातीच्या हित व कल्याणासाठी अशा दीर्घकालीन कोरोना आजारामुळे विसकटलेल्या अर्थार्जन व आर्थिक विकासाची घडी सुव्यवस्थित घालून समग्र मानवी जीवन पूर्वपदावर आणण्यासाठी सर्वच सुज्ञ व विद्वान विचारवंतानी ठोस उपाय योजना कारण्याकामी सर्वार्थाने प्रयत्न करणे गरजेचे आहे अन्यथा सार्वत्रिक आर्थिक विकासात्मक प्रक्रियेत भविष्य अधिकच अंधकारमय होईल. जगातीलच नव्हे तर आपल्या देशातीलही सर्वच शेतकरी, कामगार, कष्टकरी, छोटे-मोठे उद्योग व्यावसायिक व गरिबांचे जीवन उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. मी लेखनकर्ता असल्यामुळे जनभावनेच्या व्यथा आपल्या समोर ठेवण्याचा छोटासा प्रयत्न करत आहे. सर्वच वाचक व तज्ञ मंडळी यावर सल्ले देण्यापेक्षा निश्चितच ठोस उपाय योजना व मार्ग सुचवून थांबलेले हे समग्र जनजीवन पूर्वपदावर आनण्यासाठी सहकार्य करतील हीच मनोमन अपेक्षा. पौराणिक काळातील चक्रव्यूह भेदून चक्रव्यूहात अडकणारा भारतीय आज नाही, एकविसाव्या शतकातील समग्र संकटाला समर्थपणे तोंड देऊन मुकाबला करणारा व अशा संसर्गरूपी संकटाचा समर्थपणे संपूर्ण भेद करणारा भारत देश आज जगासमोर उभा आहे. गरज आहे ती भीती न बाळगता प्रबळ इच्छाशक्ती जागृत ठेऊन ठोस उपाय योजना करण्याची आणि विस्कटलेली घडी व जनजीवन पूर्वपदावर आणण्याची. ‘शतकोटी दारिद्रयाला आनंतकोटी उपाय आहेत’. सर्वांनी प्रयत्नवादी असणे ही काळाची गरज आहे. ‘आंधी से तुफां से डरके नौका पार नही होती। कोशिष करने वालोंकी कभी हार नही होती।’
-लाल सलाम। इन्कलाब जिंदाबाद।              
कॉ.के.के.जांबकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]