Header Ads Widget

कठीण काळात प्रामाणिक काम करणार्‍यांना सलाम!

कठीण काळात प्रामाणिक काम करणार्‍यांना सलाम!

संपुर्ण जग आणि आपला देश, महाराष्ट्रही कोरोनामुळे अभुतपूर्व अशा ‘लॉकडाऊन’ परिस्थितीचा सामना करीत आहे. मागील 60-70 वर्षात तरी भारतातीलच नव्हे तर जगातील जनतेच्या ‘लॉकडाऊन’ ‘सोशल डिस्टन्सीग’ ‘विलगीकरण’ ‘होम कॉरनटाईल’ अशा प्रकारचे शब्द पहिल्यांदाच कानावर पडत असाव्यात. याचा अर्थ मागील 60-70 वर्षात पहिल्यांदाच अशी परिस्थीतीचा अनुभव आपण घेत आहोत. म्हणजे सर्व सामान्य माणसापासून ते शासन, प्रशासनासाठीही हाताळण्यासाठी ही परिस्थिती नवखीच आहे. या संदर्भात जागतिक स्तरावरील अनुभवावरुन आलेल्या ह्या उपाययोजना नव्याने आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करणे शासन, प्रशासनासाठी एवढे सोपे नव्हते तरी प्रशासनातील सर्वच विभागातील बहुसंख्य अधिकारी व कर्मचार्‍यांनी खरोखरच मनातून काम केले. त्यांच्याबद्दल ऋण व्यक्त करणे अशा विचित्र परिस्थीतीत आवश्यक आहे.
एरव्ही ‘सरकारी काम सहा महिने थांब’ हा वाक्‌प्रचार खास करुन महसूल विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या बाबतीत वापरला जात असे. आज मात्र याच विभागाचे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चालू असलेले काम खरोखरच कौतुकास्पद आहे. परिस्थिती विचित्र आहे. संसर्गाने हा आजार असल्याने जागतिक स्तरावर गर्दी टाळण्याच्या सूचना, उपाययोजना म्हणून दिल्या जात आहेत. शासन निर्णयानुसार केवळ 5 टक्के कर्मचार्‍यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. शासनाकडून दररोज नवनवीन सुचना केल्या जात आहेत. नागरिकांच्या दररोज शेकडो तक्रारी, लोकप्रतिनिधींच्या सुचना, कार्यालयीन बैठका या सर्व पार्श्वभूमीवर महसूल विभागातील स्वतः जिल्हाधिकारी वायु वेगा समान कार्यरत असल्याने प्रशासकीय कार्याचा एक नवा अनुभव सर्वसामान्य जनतेस पहावयास मिळत आहे. काम नियोजनपूर्वक असेल तर सहसा गोंधळाची परिस्थिती निर्माण होत नाही. याचा अनुभव महसूल विभागातील कार्यावरुन जाणवत आहे. स्वतः जिल्हाधिकारी विपीन इटनकर, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.खुशालसिंह परदेशी, सर्व उपजिल्हाधिकारी, पुरवठा अधिकारी, तहसीलदार व त्यांच्या संपुर्ण यंत्रणेच्या कार्यात नियोजनात्मक शिस्तीचा अभुतपूर्व असा अनुभव सर्वसामान्य नागरिकांना अनुभवयास मिळत आहे. खरे तर महसूल विभाग हा सर्व प्रशासकीय यंत्रणेचे नियंत्रण करणार असतो. म्हणूनच जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा प्रमुख अधिकारी म्हणून मानला जातो. व तो जिल्ह्यातील महसूल विभागाचा तर प्रमुख असतोच शिवाय जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेसाठीही जबाबदार असतो. महसूल विभागाकडे अनेक महत्वपूर्ण बाबींचा कार्यभार असतो. म्हणून कोरोना सारख्या अदृश्य शत्रुशी लढत असतांना महसूल विभागाचे या लढाईतील योगदान विसरुन चालणार नाही. महसूल अधिकारी, कर्मचार्‍यांच्या कार्यास आमचा सलाम!
- प्रदीप नागापूरकर,नांदेड.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]