Header Ads Widget

स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नव्हे

स्वातंत्र्याचा अर्थ स्वैराचार नव्हे

प्रथम मी घटनेला मानणारा एक भारतीय आहे. घटनाकारांनी मार्गदर्शक तत्वांची जाणीव ठेवून भारतात राहण्याची मुभा दिलेली आहे. त्या मागे काही कायदे, नियम, संस्कार व सर्वधर्म समभाव मानुन समाजात राहण्यासाठी कटीबध्द केलेले आहे. त्यामुळे घरात, समाजात, देशात राहत असतांना जसे स्वातंत्र्य अबाधीत ठेवले आहे तसे काही कायदे व नियमांचे शाश्वत संकेत व अटीही घालून दिलेल्या असल्यामुळे समाजात व सार्वजनिक जीवनात वावरत असतांना काही मर्यादाही ठरवुन दिलेल्या आहेत. घटनाकारांनी घटना तयार करत असतांना सर्वच जाती धर्मांना आपआपल्या चौकटीत राहून संस्कार, संवेदना, आस्था, आपुलकी कुटुंब व समाजा प्रतीचे आपले योगदान अशा सर्वच गोष्टींचा सकारात्मक भावनेने विचार करुन वेगवेगळ्या जाती-धर्माच्या लोकांना आपआपले स्वातंत्र्य बहाल केले असल्यामुळे किरकोळ अपवादात्मक गोष्टी सोडल्या तर आजही गुण्या गोविंदानेच आपण भारतीय नांदत आहोत याचा जगालाही हेवा वाटतो.
मी प्रथम कबुल केलेले आहे की, मी भारतीय असून भारतीय घटनेशी बांधील असून त्याचा नेहमीच आदर व सन्मान करतो. आज आपल्या देशात अठरापगड जाती-धर्माचे लोक राहत असून अनेक राजकीय पक्ष कार्यरत आहेत. जे नेहमीच सत्तेसाठी प्रयत्नशील असतात. मी स्वतः कट्टर साम्यवादी विचाराचा पाईक असूनही आमच्या कौटुंबिक संस्कारातून व वरिष्ठांच्या मार्गदर्शक तत्वानुसार चालत असल्यामुळे इतर कुठल्याही जाती, धर्माबद्दल किंवा राजकीय पक्षाच्या कनिष्ठ, वरिष्ठ पदाधिकार्‍यासोबत, किंवा प्रशासकीय स्तरावर जनहितासाठी काम करत असतांना कधीच कुणाशी अवमानकारक अथवा लांच्छनास्पद बोलत व वागत नाही. आमचे वागणे नेहमीच टेक-रिसपेक्ट गीव्ह रिसपेक्ट नुसारच चालत असतो. त्यामुळे समग्र समाज रचनेत व राजकीय क्षेत्रात आमच्या प्रती नेहमीच आदर व सन्मानाची भावना असल्याचे अगदी जवळून अनुभवतो.
वर्षानुवर्षापासून आपल्या भारतीय संस्कृतीला संस्कार, संवेदना, सहनशिलतेची झालर असल्यामुळे इतरांच्या तुलनेत समग्र भारतीयांचे एक आगळे-वेगळे अस्तित्व असून संपुर्ण जग याला मनोमन मानुन अनुकरणास्तव उतावीळ आहे. पण ‘घर की मुरगी दाल बराबर’ या उक्तीप्रमाणे या सर्वच गोष्टीचा अभाव आमच्या संस्कृतीत वर्तमानात अधिकच जाणवत आहे. वीस ते पंचवीस टक्के समाज व लोक सोडले तर उर्वरीत भारतीयांमध्ये अशा संस्काराचे प्रमाणे अजुनही कायम आहे. पण वर्तमानात पाश्चात्य संस्कृती अनुकरणाने व सोशल व इलेक्ट्रॉनिक मिडियामुळे आपण घरी बसून जग बघत असतांना चांगले विचार व संस्कार सोडून आपल्या संस्कृतीला न शोभणारे संस्कार व विचारच जास्त प्रमाणात अनुकरण करत असल्याचे वर्तमानातील वास्तव चित्र आहे. कुठलेही काहीही बघुन आपला तोल गेल्यागत आपण वागत आहोत ही भारतीय संस्कृतीला शोभेनाशी बाब आहे. जसे पेरले तसे उगवते अशी म्हण आपल्या संस्कृतीत रुढ आहे. कुटुंबातील किंवा देशाच्या उच्चपदस्थ व्यक्तीमत्वाबद्दल केवळ चमकोगिरी करण्यासाठी हाड नसलेल्या जीभेप्रमाणे म्हणतात तसेच सर्वदूर वर्तन होवून फेसबुक व व्हॅटस्‌ऍपच्या माध्यमातून निर्लजपणे समाजासमोर उभे टाकत आहोत. त्यामुळे हीच का आपली संस्कृती म्हणून संपुर्ण जग उघड्या डोळ्याने आपल्या अशा वागणुकीचे वास्तव बघत आहे. आपले कुटुंब व आपल्या उच्चपदस्थ राष्ट्रप्रमुखाबद्दल काहीही अर्वाच्य व अवमानकारक बोलणे व वागणेही आपली भारतीय संस्कृती नाही. म्हणून लोकशाहीत घटनेने जरी आपणास स्वातंत्र्य बहाल केले असले तरी आपले विचार व आचरण हे नेहमीच सुहृदयशिल व सर्वांसाठी सन्मानजणक राहूनच सन्मानाने आपल्या वागणुकीचे प्रदर्शन केले पाहिजे. कोण्याही वरिष्ठाचा अवमानकारक भाषेत उल्लेख करुन आपले मत रेटणे व प्रदर्शित करणे याला स्वातंत्र्य म्हणत नाहीत. हा विचाराचा व वागणुकीचा स्वैराचार आहे.
तेंव्हा अशा स्वैराचारी व्यक्तीला घटनेत कायद्यान्वये मर्यादा आहेतच. याचाही अशा जनतेने संयमाने विचार करावा. व नेहमीच विरोधक असलो तरीही इतराशी वागतांना, बोलतांना ‘टेक रिसपेक्ट गिव्ह रिसपेक्ट’ अशा मनानेच वागुन संवाद साधावा. अन्यथा घटनाकारांचा अवमान झाल्यासारखे होवून कायदेशीर बाबीला सामोरे जावे लागेल. अशी पाळी येवू नये म्हणून तोल गेल्यागत वागणे उचित राहणार नाही.
इन्कलाब जिंदाबाद! लाल सलाम !
- कॉ.के.के.जांबकर,नांदेड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]