‘
नांदेड/प्रतिनिधी-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तथा रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज नांदेड शहरात अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पहाटेपासूनच शहरातील प्रमुख चौक, सार्वजनिक ठिकाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या नजीक शिवप्रेमींची सकाळपासून मोठी गर्दी होती. विविध राजकीय पक्ष व जनसंघटनांचे लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या हस्ते शिवप्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवजयंतीनिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळा परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. जयंतीच्या पूर्वसंध्येला शहरातून भव्य अशी मशाल रॅली काढण्यात आली होती. जयंतीनिमित्त शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरात जयंतीनिमित्त शुभेच्छाचे ठिकठिकाणी कटआऊट व बॅनर लावण्यात आले. छावा संघटनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुध अभिषेक करण्यात आला. महापौर सौ.कविता संतोष मुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच माजी मंत्री डी.पी.सावंत, महापालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, आ.प्रताप पाटील चिखलीकर, आ.बालाजी कल्याणकर, आ.आनंदराव बोंढारकर, माजी आ.सुभाष साबणे, माजी आ.अविनाश घाटे, अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपमहापौर दिपकसिंह रावत, किशोर स्वामी, विनय गिरडे पाटील, उपायुक्त अजितपालसिंघ संधु, माधव पावडे, गणेश तादलापूरकर, स.दिलीपसिंघ सोडी, दत्ता कोकाटे, बाबुराव पुजरवाड, सोपान नेवल पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, नगरसेवक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. शिवजयंतीनिमित्त तरुणांनी भव्य दुचाकी रॅली काढून रयतेच्या राजाला अभिवादन केले. ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सामाजिक व राजकीय संघटनांच्या पदाधिकार्यांच्यावतीने अनेक ठिकाणी खिचडी, पाणीपाऊच वाटप करण्यात आले. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व अन्य संघटनांच्यावतीने नवामोंढा येथे शिवजयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक देखाव्यासह काढण्यात आली होती. यावेळी पोलीसांच्यावतीनेही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाचा अभूतपूर्व सोहळा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पहिले भावूक भाषण मुंबई/प्रतिनिधी-अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत आणि स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती आज राज्यभर उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली. महाराजांचे जन्मस्थान असलेल्या ऐतिहासिक किल्ले शिवनेरी येथे मुख्य शासकीय जन्मोत्सव सोहळा पार पडला. जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषाने आणि ढोल-ताशांच्या गजराने अवघा गड आणि परिसर दुमदुमून गेला होता. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते. शिवजन्मस्थळावर मान्यवरांच्या हस्ते परंपरेनुसार सोन्याचा पाळणा जोजवण्यात आला आणि पुष्पवृष्टी करून शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पर्यटनमंत्री शंभुराज देसाई, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि हजारो शिवभक्त उपस्थित होते. पहाटेपासूनच शिवभक्तांची मांदियाळी गडावर जमू लागली होती. संपूर्ण परिसर आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. भगवे ध्वज फडकवत तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच शिवनेरीवरून जनतेशी संवाद साधला. आपल्या भाषणात त्या काहीशा भावूक झाल्याचे दिसून आले. त्या म्हणाल्या, आजचा दिवस माझ्यासाठी केवळ आनंदाचा नाही, तर मोठ्या जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. ज्या कठीण परिस्थितीत मी पदाची शपथ घेतली, त्यावेळी माझ्या डोळ्यांसमोर केवळ जिजाऊ मॉंसाहेबांची मूर्ती उभी होती. त्यांनी केवळ शिवरायांना जन्म दिला नाही, तर संकटांशी झुंज देण्याची जिद्द आणि स्वराज्याचे संस्कार दिले. तीच जिद्द घेऊन मला राज्याची सेवा करायची आहे. त्यांनी पुढे सांगितले की, अजितदादांनी आयुष्यभर ज्या फुले, शाहू, आंबेडकर आणि शिवरायांच्या विचारांची कास धरली, तोच वारसा मी पुढे नेणार आहे. राज्यातील शेतकरी आणि कष्टकरी जनतेला सुखी ठेवण्यासाठी आई शिवाई देवीकडे मी साकडे घातले आहे. सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणात अजित पवार यांनी किल्ले शिवनेरीच्या सुशोभीकरणासाठी घेतलेल्या पुढाकाराचा उल्लेख केला. तसेच आग्रा किल्ला, संगमेश्वर मंदिर, रायगड किल्ला आणि वढू बुद्रुक यांसारख्या ऐतिहासिक स्थळांच्या जतन आणि संवर्धनासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भावी पिढीला शिवरायांच्या पराक्रमातून प्रेरणा मिळावी, यासाठी ही स्मारके महत्त्वाची ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासकीय सोहळ्यानंतर सर्व मान्यवरांनी शिवनेरीवरील शिवाई देवी मंदिर येथे दर्शन घेतले. अत्यंत शिस्तबद्ध आणि चैतन्यमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने शिवभक्तांच्या मनात पुन्हा एकदा स्वराज्याचा स्वाभिमान जागा केला. ========================================
मुंबई/प्रतिनिधी-16 मार्च रोजी होणार्या राज्यसभा निवडणुकीत विधानसभेतील संख्याबळ पाहता महाविकास आघाडीचा एकच उमेदवार विजयी होऊ शकतो, महाविकास आघाडीकडून खा.शरद पवार यांनी निवडणूक लढवावी. तर त्यानंतर होणार्या विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरु असल्याची माहिती शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी दिली. राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. संख्याबळानुसार महाराष्ट्रातून महाविकास आघाडीची एकच जागा निवडून येवू शकते. याविषयी खा.संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले की, महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या नावाची राज्यसभेसाठी चर्चा सुरू असल्याचे सांगितले. शरद पवार यांच्याशी चर्चा झाली असून त्यांची राज्यसभेवर पुन्हा जाण्याची इच्छा आहे, असा दावा राऊत यांनी केला.त्याचवेळी विधान परिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा सभागृहात जावे, अशी शिवसेना (ठाकरे) पक्षाची भूमिका असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख असून त्यांनी विधिमंडळात असणे गरजेचे आहे. संघटनात्मक दृष्टीने त्यांची उपस्थिती महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.राज्यसभेतील सात सदस्य एप्रिल 2026 मध्ये निवृत्त होत असून त्यात शरद पवार, फौजिया खान, डॉ. भागवत कराड, धैर्यशील पाटील, रामदास आठवले आणि प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे. देशातील 10 राज्यांमधील एकूण 37 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.राऊत म्हणाले की, राज्यसभेची एकमेव जागा लढवायची असल्यास महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. राज्यसभेनंतर विधान परिषदेची निवडणूक असल्याने दोन्ही निवडणुकांबाबत सामूहिक चर्चा होईल. कॉंग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचेही त्यांनी सूचित केले.चंद्रपूर महापालिकेतील घडामोडींचा अप्रत्यक्ष उल्लेख करत राऊत यांनी कॉंग्रेसवर टोमणा मारला.चर्चा चंद्रपूरसारखी लांबणार नाही, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीत समन्वयाची गरज अधोरेखित केली.शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्रीकरणाच्या चर्चांवरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली‘जय भवानी-जय शिवाजी’च्या घोषणांनी नांदेड दुमदुमले शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणुका,अभिवादन सोहळे;शिवप्रेमींचा उत्स्फूर्त सहभाग नांदेड/प्रतिनिधी-हिंदवी स्वराज्याचे संस्थापक तथा रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज नांदेड शहरात अभूतपूर्व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पहाटेपासूनच शहरातील प्रमुख चौक, सार्वजनिक ठिकाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या नजीक शिवप्रेमींची सकाळपासून मोठी गर्दी होती. विविध राजकीय पक्ष व जनसंघटनांचे लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांच्या हस्ते शिवप्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शिवजयंतीनिमित्त शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळा परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती. जयंतीच्या पूर्वसंध्येला शहरातून भव्य अशी मशाल रॅली काढण्यात आली होती. जयंतीनिमित्त शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरात जयंतीनिमित्त शुभेच्छाचे ठिकठिकाणी कटआऊट व बॅनर लावण्यात आले. छावा संघटनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास दुध अभिषेक करण्यात आला. महापौर सौ.कविता संतोष मुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच माजी मंत्री डी.पी.सावंत, महापालिका आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, आ.प्रताप पाटील चिखलीकर, आ.बालाजी कल्याणकर, आ.आनंदराव बोंढारकर, माजी आ.सुभाष साबणे, माजी आ.अविनाश घाटे, अतिरिक्त आयुक्त गिरीष कदम, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपमहापौर दिपकसिंह रावत, किशोर स्वामी, विनय गिरडे पाटील, उपायुक्त अजितपालसिंघ संधु, माधव पावडे, गणेश तादलापूरकर, स.दिलीपसिंघ सोडी, दत्ता कोकाटे, बाबुराव पुजरवाड, सोपान नेवल पाटील यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, नगरसेवक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. शिवजयंतीनिमित्त तरुणांनी भव्य दुचाकी रॅली काढून रयतेच्या राजाला अभिवादन केले. ठिकठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सामाजिक व राजकीय संघटनांच्या पदाधिकार्यांच्यावतीने अनेक ठिकाणी खिचडी, पाणीपाऊच वाटप करण्यात आले. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व अन्य संघटनांच्यावतीने नवामोंढा येथे शिवजयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवजन्मोत्सव समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक देखाव्यासह काढण्यात आली होती. यावेळी पोलीसांच्यावतीनेही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. =====================================
शिवनेरी किल्ल्यावर शिवजन्मोत्सवाचा अभूतपूर्व सोहळा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पहिले भावूक भाषण मुंबई/प्रतिनिधी-अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत आणि स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती आज राज्यभर उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरी करण्यात आली. महाराजांचे जन्मस्थान असलेल्या ऐतिहासिक किल्ले शिवनेरी येथे मुख्य शासकीय जन्मोत्सव सोहळा पार पडला. जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषाने आणि ढोल-ताशांच्या गजराने अवघा गड आणि परिसर दुमदुमून गेला होता. या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि नवनियुक्त उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते. शिवजन्मस्थळावर मान्यवरांच्या हस्ते परंपरेनुसार सोन्याचा पाळणा जोजवण्यात आला आणि पुष्पवृष्टी करून शिवरायांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पर्यटनमंत्री शंभुराज देसाई, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि हजारो शिवभक्त उपस्थित होते. पहाटेपासूनच शिवभक्तांची मांदियाळी गडावर जमू लागली होती. संपूर्ण परिसर आकर्षक फुलांनी आणि विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. भगवे ध्वज फडकवत तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पहिल्यांदाच शिवनेरीवरून जनतेशी संवाद साधला. आपल्या भाषणात त्या काहीशा भावूक झाल्याचे दिसून आले. त्या म्हणाल्या, आजचा दिवस माझ्यासाठी केवळ आनंदाचा नाही, तर मोठ्या जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे. ज्या कठीण परिस्थितीत मी पदाची शपथ घेतली, त्यावेळी माझ्या डोळ्यांसमोर केवळ जिजाऊ मॉंसाहेबांची मूर्ती उभी होती. त्यांनी केवळ शिवरायांना जन्म दिला नाही, तर संकटांशी झुंज देण्याची जिद्द आणि स्वराज्याचे संस्कार दिले. तीच जिद्द घेऊन मला राज्याची सेवा करायची आहे. त्यांनी पुढे सांगितले की, अजितदादांनी आयुष्यभर ज्या फुले, शाहू, आंबेडकर आणि शिवरायांच्या विचारांची कास धरली, तोच वारसा मी पुढे नेणार आहे. राज्यातील शेतकरी आणि कष्टकरी जनतेला सुखी ठेवण्यासाठी आई शिवाई देवीकडे मी साकडे घातले आहे. सुनेत्रा पवार यांनी आपल्या भाषणात अजित पवार यांनी किल्ले शिवनेरीच्या सुशोभीकरणासाठी घेतलेल्या पुढाकाराचा उल्लेख केला. तसेच आग्रा किल्ला, संगमेश्वर मंदिर, रायगड किल्ला आणि वढू बुद्रुक यांसारख्या ऐतिहासिक स्थळांच्या जतन आणि संवर्धनासाठी महायुती सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भावी पिढीला शिवरायांच्या पराक्रमातून प्रेरणा मिळावी, यासाठी ही स्मारके महत्त्वाची ठरतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासकीय सोहळ्यानंतर सर्व मान्यवरांनी शिवनेरीवरील शिवाई देवी मंदिर येथे दर्शन घेतले. अत्यंत शिस्तबद्ध आणि चैतन्यमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्याने शिवभक्तांच्या मनात पुन्हा एकदा स्वराज्याचा स्वाभिमान जागा केला
शिवाजी महाराज जयंती
मुंबई/प्रतिनिधी-16 मार्च रोजी होणार्या राज्यसभा निवडणुकीत विधानसभेतील संख्याबळ पाहता महाविकास आघाडीचा एकच उमेदवार विजयी होऊ शकतो, महाविकास आघाडीकडून खा.शरद पवार यांनी निवडणूक लढवावी. तर त्यानंतर होणार्या विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्या नावाची चर्चा सुरु असल्याची माहिती शिवसेनेचे खा. संजय राऊत यांनी दिली. राज्यसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. संख्याबळानुसार महाराष्ट्रातून महाविकास आघाडीची एकच जागा निवडून येवू शकते. याविषयी खा.संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले की, महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या नावाची राज्यसभेसाठी चर्चा सुरू असल्याचे सांगितले. शरद पवार यांच्याशी चर्चा झाली असून त्यांची राज्यसभेवर पुन्हा जाण्याची इच्छा आहे, असा दावा राऊत यांनी केला.त्याचवेळी विधान परिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा सभागृहात जावे, अशी शिवसेना (ठाकरे) पक्षाची भूमिका असल्याचेही राऊत यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे हे पक्षप्रमुख असून त्यांनी विधिमंडळात असणे गरजेचे आहे. संघटनात्मक दृष्टीने त्यांची उपस्थिती महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.राज्यसभेतील सात सदस्य एप्रिल 2026 मध्ये निवृत्त होत असून त्यात शरद पवार, फौजिया खान, डॉ. भागवत कराड, धैर्यशील पाटील, रामदास आठवले आणि प्रियंका चतुर्वेदी यांचा समावेश आहे. देशातील 10 राज्यांमधील एकूण 37 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे.राऊत म्हणाले की, राज्यसभेची एकमेव जागा लढवायची असल्यास महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र बसून निर्णय घेतील. राज्यसभेनंतर विधान परिषदेची निवडणूक असल्याने दोन्ही निवडणुकांबाबत सामूहिक चर्चा होईल. कॉंग्रेसची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचेही त्यांनी सूचित केले.चंद्रपूर महापालिकेतील घडामोडींचा अप्रत्यक्ष उल्लेख करत राऊत यांनी कॉंग्रेसवर टोमणा मारला.चर्चा चंद्रपूरसारखी लांबणार नाही, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीत समन्वयाची गरज अधोरेखित केली.शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्रीकरणाच्या चर्चांवरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवार भाजपसोबत जाणार नाहीत. ते महाविकास आघाडीसोबत होते. शरद पवार भाजपसोबत जाणार नाहीत. ते महाविकास आघाडीसोबत होते


0 تعليقات