Header Ads Widget

नांदेडच्या कोरोना रुग्णांची संख्या आता ३१ वर रविवारी सकाळी आणखी पाच नव्या रुग्णांची भर आज पुन्हा एका महिलेचा मृत्यू

नांदेडच्या कोरोना रुग्णांची संख्या आता ३१ वर मृतांची संख्या २वरून ३वर
रविवारी सकाळी आणखी पाच नव्या रुग्णांची भरcoronavirus, virus, mask, corona, pandemic, outbreak, disease, epidemic, sars-cov-2, covid-19, pathogen

नांदेड/प्रतिनिधी
नांदेड शहरातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून शनिवारी सकाळी गुरुद्वारा लंगर साहेब मधील २० कर्मचाऱ्यांचा कोरोना आजारा संदर्भातील वैद्यकीय अहवाल पॉझिटिव आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. आज रविवारी सकाळी पुन्हा तीन नव्या रुग्णांची भर पडली होती.दुपारी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात आणखी दोन नवे रुग्ण समाविष्ट झाले.आज रविवारी एकूण ५ रुग्ण वाठले त्यापैकी देगलर  रोड वरील आजच आढलून आलेल्या महिलेचा उपचाादरम्यान मृत्यू झाला.या महिलेवर सारी आजार बाबत खाजगी रुग्णालात उपचार सुरू होते नांदेड परिसरात आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या ३१ वर जाऊन पोहोचली आहे. तर मृतांचा आकडा ३ झाला आहे
       19 मार्च ते 22 एप्रिल पर्यंत नांदेडमध्ये एकही कोरोना बाधित रुग्ण नव्हता 23 एप्रिल रोजी शहरातील पीर बुर्‍हाण भागात एक 64 वर्षीय वृद्ध  ईसम  कोरोना बाधित आढळला.या रुग्णांस पूर्वी पासूनच शुगर,बीपी,दमा यासारखे आजार होते त्याच्या संपर्कातील व त्याच्या नातेवाईकाचे सर्व आहवाल निगेटिव्ह आले होते,त्यामुळे या वृद्ध रुग्णाच्या पॉझिटिव आल्याबद्दल शंका व्यक्त केली जात असतानाच,त्याचा दुसरा आवहल निगेटिव्ह आला.याच दरम्यान परभणी जिल्ह्यातील सेलू या गावातून एक वृद्ध महिला आपल्या दोन मुलांसह नांदेडमध्ये दाखल झाली. महिलेचे व तिच्या दोन मुलांची कोरोना तपासणी केली असता महिलेचा आवाहाल पॉझिटिव आला व तिच्या दोन मुलांचे अहवाल निगेटिव्ह आलेे होते. पिरबुरहान मधील दुसरा अहवाल निगेटिव्ह आलेला वृद्ध व  सेलू ची वृद्ध महिला या दोघांचे एकामागून एक निधन झाले. त्यापाठोपाठ गुरुद्वारा दर्शनासाठी आलेल्या पंजाबच्या भाविकांना पंजाब पर्यंत सोडून आलेल्या वाहन चालक व त्याच्या मदतनीस असे मिळून तिघांचे कोरोना तपासणीचे आहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यात आज रविवार दि.२ मे रोजी भाविकांना पंजाब ला भाविकांना सोडून आलेल्या २  वाहन चालकांचे अहवाल सकारात्मक आले आहेत
दि. ३० एप्रील ते दि.१मे दरम्यान गुरुद्वारा लंगर साहेब मध्ये असलेल्या  कर्मचाऱ्यांची करोना तपासणी करण्यात आली होती. त्यातील २० कर्मचाऱ्यांचे वैद्यकीय अहवाल शनिवार दिनांक 2 मे रोजी पॉझिटिव आले त्यामुळे नांदेड शहरातील कोरोना पॉझिटिव्ह ची संख्या सव्वीस झाली होती.रविवारी देगलूर रोड भागातील एक महिला तिच्यावर शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना याही महिलेचा कोरोना तपासणीचा अाहवाल पॉझिटिव आला आह. त्यासोबत गुरुद्वारा लंगर साहेब मधून पंजाबला भाविकांना सोडून आलेली २ वाहन चालकांचे अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आल्याने नांदेड मधील कोरोना पॉझिटिव्ह ची संख्या आता 29 वर जाऊन पोहोचली आहे.

إرسال تعليق

0 تعليقات

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]