Header Ads Widget

नांदेडमध्ये कोरोना चारही बाजूने दाखल!

* नवे २२ रुग्ण सापडले
* एकाच दिवशी एवढे
   रुग्ण आढळण्याची
   पहिलीच वेळ
* नवीन भागात
   कोरोनाचा फैलाव

कोरोना रुग्णांची संख्या गतीने वाढत असताना शनिवारी २२ नवे रुग्ण आढळल्याने एकाच दिवशी एवढे रुग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे.गेल्या चार दिवसात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी वेळात ३०० चा आकडा पार करणार असल्याचे दिसते.
आज सापडलेले रुग्ण या भागातील आहेत -
- कामठा -               १
- विजय कॉलनी -      १
- पदमजा सिटी  -      १
- सोमेश कॉलनी  -     २
- यशवंतनगर -           १
- न्यायनगर -              १
- श्रीकृष्णनगर ,-         १
- विणकर कॉलनी -     १
- संत ज्ञानेश्वरनगर -    १
- झेंडा चौक -             १
- दिपनगर -                १
- एचआयजी कॉलनी- १
- चिखलवाडी -           २
- भाग्यनगर रोड -       १
- सिडको -                 १ -स्वामी विवेकानंदनगर १
- विश्वदिपनगर -         १
- महावीर चौक -         १
- ईतवारा -                 १
- चैतन्यनगर -             १




'त्या' सहकारी बॅँकेतील कोरोनाचे खाते वाढले!
- अनेक महिला कर्मचाऱ्यांचा समावेश

महावीर चौक भागात असलेल्या एका बॅँकेतील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्या बॅँकेतील अनेक कर्मचारी
संक्रमित झाल्याची माहिती असून त्यात महिलांची संख्या जास्त असल्याचे सांगण्यात येते.

إرسال تعليق

0 تعليقات

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]