कोरोनाचा पुन्हा भडका नवे 32 रुग्ण 30 कोरोना मुक्त तर तिघांचा मृत्यू

नांदेड/प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यात काल मंदावलेली कोरोना रुग्णांच्या संख्येने पुन्हा भडका उडाला असून आज नवीन 32 रुग्णांची भर पडली आहे.आज तिघांचा मृत्यू झाला आहे.तर 30 रुग्ण कोरोना मुक्त झाले असल्याचे प्रशासकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे.
नांदेड जिल्ह्यात गुरुवारी केवळ 11 रुग्ण आढळून आल्याने समाधान व्यक्त होत असताना शुक्रवारी 32 नव्या रुग्णांची भर पडली आहे.बुधवारी रात्री आणि गुरुवारी सकाळपर्यंत एकूण तीन रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.त्यासोबत 30 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याचेही या अहवालात म्हटले आहे.
आज आलेल्या वैद्यकीय अहवालात नांदेड शहरातील एकूण 8 रुग्ण,देगलूर तालुक्यात 7 रुग्ण ,नायगाव तालुक्यात पाच रुग्ण धर्माबाद 4 ,मुखेड 2 ,बिलोली 2 आणि परभणी हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येकी एक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.नांदेड शहरातील खालसा कॉलनी 59 वर्षीय पुरुष,देगलूर नाका भागात 60 वर्षीय पुरुष,प्रकाश नगर भागात 31 वर्षीय पुरुष,प्रेम नगर भागात दोन रुग्ण आढळले असून 31 आणि 49 वर्षीय पुरुष, तर विष्णूनगर भागात 36 वर्षीय पुरुष, दुलेशान रेहमान नगर ताहेर किराणा जवळ 38 वर्षीय पुरुष ,पावडेवाडी नाका परिसरात 37 वर्षीय एक पुरुष, कंधार तालुक्यातील फुलवळ येथे 13 वर्षीय महिला व कंधार शहरात 43 वर्षीय महिला असे 2 रुग्ण आढळले आहेत.
मुखेड तालुक्यातील काकांडी वाडी येथे एक 44 वर्षीय पुरुष, मुखेड शहरामध्ये 65 वर्षीय महिला नायगाव तालुक्यातील कुंटूर येथे 5 रुग्ण आढळले असून ज्यामध्ये 5 वर्षाचा 1,8 वर्षाचे 2 मुलं,38 वर्षीय पुरुष व एका 25 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
धर्माबाद तालुक्यातील पटेल नगर येथे 74 वर्षीय महिला,गुजराती कॉलनी 40 वर्षीय पुरुष व 52 वर्षीय महिला,धर्माबाद शहरात 45 वर्षीय पुरुष,बिलोली तालुक्यातील कासराळी येथे 39 वर्षीय पुरुष ,गुजरी या गावात 32 वर्षीय पुरुष तर देगलुर तालुक्यातील नागोबा मंदिर येथे एक 60 वर्षीय महिला ,बालाजी झेंडा परिसरात 50 वर्षीय पुरुष व 48 वर्षीय महिला आढळले आहेत.टाकळी येथे एक 55 वर्षीय पुरुष,आनंद नगर तालुका देगलूर 28 वर्षीय महिला,देगलूर शहरात आणखी दोन रुग्ण आढळले असून त्यांचे वय 47 व 70 वर्षे आहे.तोफखाना स्टेशन रोड हिंगोली परिसरातील 40 वर्षीय व गंगाखेड येथील एक 50 वर्षीय पुरुष नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात आज 30 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून पंजाब भवन कोव्हिड केअर सेंटर येथील दोन रुग्ण,नायगाव पाच रुग्ण,मुखेड येथील 14 रुग्ण,शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथील 8 रुग्ण तसेच संदर्भित करण्यात आलेल्या खासगी रुग्णालयातील एक रुग्ण असे 30 रुग्ण बरे झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयातून सुटी देण्यात आलेली आहे.
प्रशासकीय गलथानपणा पुन्हा उजागर
जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज जारी करण्यात आलेल्या वैद्यकीय अहवालात काल रात्री मृत्यू पावलेल्या फुलवळ तालुका कंधार येथील 64 वर्षीय पुरुषाचा उल्लेख गहाळ झाला होता.आजचा वैद्यकीय अहवाल सोशल मीडियावर प्रकाशित झाल्यानंतर काही जागृत पत्रकारांनी यासंदर्भात जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे खुलासा मागितल्यानंतर पूर्वीच्या मृत्यू रुग्णांची नोंद करण्यात आली. आज मृत्यू पावलेल्यांमध्ये जिंतूर तालुक्यातील कावी या गावातील 70 वर्षीय पुरुष व कळमनुरी येथील 66 वर्षीय पुरुष, कंधार तालुक्यातील फुलवळ येथील 64 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
0 تعليقات