कोरोनाचे आणखी पाच बळी, दहा जण कोरोना मुक्त तर 34 नवीन रुग्ण

नांदेड /प्रतिनिधी
मागील 24 तासात कोरोना महामारीने जिल्ह्यात पाच जणांचा बळी घेतला आहे तर आज नवीन 34 रुग्णांची भर पडली आहे.
आज एकूण पाच रुग्ण कोरोना मुक्त झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक निळकंठ भोसीकर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रसिद्धीस देण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात आज नव्याने 34 रुग्णांची भर झाल्याचे म्हटले आहे.यामध्ये वजिराबाद भागातील एस पी ऑफिस परिसरात एक 65 वर्षीय महिला,सोमेश कॉलनी भागातील 58 वर्षीय पुरुष,चौफाळा भागातील 78 वर्षीय एक वृद्ध व 20 वर्षीय महिला,वजिराबाद भागातील एकूण सात रुग्ण आहे यामध्ये 18,25,47 वर्षाचे पुरुष व 38,44,60,70 वर्षाच्या महिलांचा समावेश आहे.
इतवारा भागात 67 वर्षीय पुरुष,नवा पूल कवठा भागात 16 वर्षीय मुलगा व 11 वर्षीय मुलीचा समावेश आहे. आनंद नगर भागात एकच रुग्ण सापडला असून 65 वर्षीय पुरुष आहे,वाजेगाव परिसरात 63 वर्षीय महिला,देगलूर तालुक्यातील अंबिकानगर येथे 3 रुग्ण सापडले असून 23 वर्षीय पुरुष व 19 आणि 43 वर्षीय 2 महिला देगलूर तालुक्यातील खानापूर येथे 42 वर्षीय तरुण,देगलुर शहरातील लाईन गल्ली परिसरात 40 वर्षीय पुरुष,बिलोली येथील गांधी चौक भागात 2 रुग्ण आढळले असून 70 वर्षीय वृद्ध व 65 वर्षीय महिला आहे.बिलोली तालुक्यातील कासराळी येथे एक 60 वर्षीय महिला,मुखेड तालुक्यातील तबेला गल्ली 50 वर्षीय महिला,मदलापुर 64 वर्षीय पुरुष,मुखेड शहरात 2 रुग्ण आढळले असून 35 व 64 वर्षीय पुरुष,कंधार येथील विकास नगर भागात एक 75 वर्षीय पुरुष,कंधार शहरात 72 वर्षीय पुरुष,धर्माबाद शहरातील मस्ती गल्ली भागात 23 वर्षीय महिला,लोहा येथे 80 वर्षीय वृद्ध ,नायगाव येथे 30 वर्षीय पुरुष,परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथील एक 45 वर्षीय महिला नांदेड येथे उपचारार्थ दाखल झाली आहे.आज एकूण 34 जणांचे वैद्यकीय आव्हाल आज प्राप्त झाले आहे.
पाच बळी
शनिवार दिनांक 12 जुलै रोजी रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार धनेगाव भागातील 9 महिन्याचे बालक,लातूर जिल्ह्यातील जळकोट येथील 60 वर्षीय पुरुष ,तबेला गल्ली मुखेड येथील 85 वर्षीय पुरुष.आज सकाळी प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालात कंधार येथील विकास नगर भागातील 75 वर्षीय पुरुष आणि धुले शाह नगर भागातील 61 वर्षीय महिला असे एकूण 5 जणांचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोनाने मृत पावलेल्या रुग्णांची संख्या 35 एवढी झाली आहे.तर 230 पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.त्यातील 27 रुग्णांची ज्यात 12 महिला आणि 15 पुरुष रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याचे या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे.
-------------
-------------
लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः....
नांदेड /प्रतिनिधी
कोरोना सारख्या महामारी चा प्रादुर्भाव रोखण्याची सर्वात मोठी जबाबदारी महापालिका सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर आहे.नांदेड महापालि के ने अर्थसंकल्प चा फोटो झळकविण्यासाठी सोशल डिस्टन्स चा फज्जा उडविला. ही बाब सर्वसामान्य माणसासाठी अत्यंत क्लेशदायक आहे
मनपाच्या नाकर्तेपणा व चुकीच्या धोरणाविरुद्ध आंदोलन करणाऱ्यांना मज्जाव करण्यासाठी साथ रोग प्रतिबंधक कायद्याचा बडगा दाखवला जातो त्यासोबत कलम 144 चाही दाखला दिला जातो.
आजचा संकल्प फोटो संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेत चमकोगिरी करणाऱ्या महापालिकेतील अधिकारी व पदाधिकार्यांवर रोग प्रतिबंधक कायदा व कलम 144 नुसार गुन्हे दाखल केल्यास नागरिकांमध्ये फिजिकल डिस्टन्स संचारबंदी,लॉक डाऊन साठी स्वतः रस्त्यावर उतरणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्याचे महत्त्व सर्वसामान्य माणसाच्या लक्षात येईल.ते विनाकारण घराबाहेर पडण्याचे त्याचप्रमाणे गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाला मनापासून सहकार्य करतील.
0 تعليقات