लॉकडाऊनचा फायदा फक्त पुरुषांनाच; महिलांची मात्र घरोघरी ओरडच
भारताच्या पुरूष प्रधान संस्कृतीत महिलांच्या सक्षमी व सबलीकरनासाठी व पुरुषासारखेच त्यांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात स्वातंत्र्य रहावे व त्यांच्या चूल व मूल यापलीकडे जाऊन सर्वार्थाने विकास व्हावा व सक्षमता यावी म्हणून सुरक्षात्मक बाबींचा विचार करून कायद्यान्वये त्यांना सुरक्षित केलेले आहे पण वर्तमानात त्यांची सुरक्षा,संरक्षण व हक्काबाबत भारतीय समाजात अजून म्हणावी तशी प्रगती झाली नाही हे सत्यच आहे. यासाठी महिलांची मानसिकता कारणीभूत आहे. काही का असेना आमच्या बर्याचशा माता भगिनी दैनंदिन संसाराचा गाडा हाकून देखील समाजाच्या विविध क्षेत्रात आज हिरीरीने पुढाकार घेऊन आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवून आपले कुटुंब सांभाळून जगत असतात.समाजाच्या विविध अंगातील त्यांचे कर्तृत्व आजही वाखानण्याजोगी आहे.वर्षातून एक दिवस जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने त्यांना फुगवून त्यांच्या कार्य कौशल्य कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत असतेच पण वर्षाच्या तीनशे पासष्ट दिवसाचे काय? माझ्या लिखानात मी एक दिवसही वगळत नाही कारण त्या निमित्ताने का होईना चूल आणि मूल यापासून त्यांची सुटका होते का? याचे उत्तर नकारार्थीच असेल. आमच्या माता भगिनी भावनिक व कर्तव्यशील स्वभावाच्या असल्यामुळे आमच्या पुरुष प्रधान संस्कृतीला त्या मनोमन नाकारू शकत नाही. कितीही थकली भागली तरिही आपल्या कुटुंबाप्रती त्यांची आस्था व वात्सल्य कायम टिकूनच असते. याला अपवाद आहेतच.पुरुष प्रधान संस्कृतीत आजही अशा वासल्य प्रेमी स्वभावाची म्हणावी तशी दखल घेतल्या जात नाही हे सत्यच आहे. आता बघा की, मागच्या दहा बारा दिवसापासून कोरोनाच्या भीतीने सबंध जगभर लॉकडावुन वून झाल्यामुळे कुणालाही कायद्याने बाहेर फिरण्याची मुभा नाही. त्यामुळे शंभर टक्के पुरुष मंडळी देखील स्वरक्षणासाठी घरातच अडकून बसलेली आहेत. एरवी काम व स्वच्छंदी स्वभावामुळे सतत बाहेर फिरणारी पुरुष मंडळी बंदिस्त झालेली आहेत. नेहमीप्रमाणेच खरे खोटे बोलून काही न काही बहाणे करणार्या या मंडळीला घरात सारखेच बसणे अवघड झाल्यामुळे काही ना काही युक्त्या काढून महिलांची नेहमीपेक्षा जास्तच गैरसोय करत असल्याचे वाटत आहे. पुरुष बाहेर कामाला गेले की एरवी काहीतरी घरातली दैनंदिन कामे करणार्या व कुटुंबासाठी सर्वकाही तयार ठेवणार्या महिलांसाठी लॉकडाऊन झाल्यामुळे मोठेच तापदायक झालेले आहे. विनोदाचा भाग म्हणून नेहमीपेक्षा त्यांच्या दैनंदिन कामाचा जास्त झालेला व्याप लक्षात घेता कसलीही फुरसत नसल्यामुळे घरोघरी लॉक डाऊन बद्दल महिलांच्या मनात संताप व्यक्त होत असल्याचे चित्र आहे. घरात गुपचूप बसून न राहता घरातील पुरुषमंडळी नको ते व जास्तीचे काम लावून आणखीच जास्त त्रासदायक करत असल्यामुळे हा लॉकडाऊन महिलांसाठी नसून केवळ पुरुषांसाठीच आहे की काय असे सर्वत्र वाटत आहे. एरवी शॉपिंग, पर्यटन, हॉटेलिंग करण्यामुळे का होईना महिलांना पुरूषा कडे मागणी करता येत होती आता सर्वत्र बंदच बंद असल्यामुळे या लॉक डाऊन चा समग्र महिलांना विशेष फटका बसला आहे तेव्हा कुटुंब प्रमुखांना आग्रहाची विनंती की लॉक डाऊनचा कार्यकाल संपताच या सुट्ट्या रुपी कैदेची भरपाई करण्यासाठी उन्हाळी सुट्ट्यात यांना विशेष सवलत व स्वातंत्र्य देऊन एन्जॉय करू द्या!
एका गृहिणीची व्यथा
चौदा तारखेपर्यंत देशात लॉक डाऊन झालं,
किचन मात्र माझं, सतत सुरू झालं
रोज नवीन डिश बनवू, संकल्प केला मनात,
पण आठ दिवसांत, तो गेला केराच्या डब्यात!
एका जागी बसून, यांना भूक कशी लागते?
नवीन काही बनव,अशी फर्माइश सारखी येते।
भांडी, किचन आवरून, थोडा निःश्वास टाकताच,
बाथरूम, कपडे आणि फरशी वाट बघत असतात।
करू तुला मदत, तोंडावर म्हणतात सगळे,
वेळ येता कामाची, हजार सबबी पुढे।
केलेच चुकून काही काम तर,विडिओ बनवतात त्याचा,
टाकून फॅमिली ग्रुप वर तो, कौतुक घेतात स्वतः।
आता कंटाळून, माहेरी जायचीही सोय राहिली नाही,
घायाळ ही वाघीणी आता, पिंजर्यात बंद झाली।
आधी कोरोनाची सुट्टी, वाटली मोठी मजा,
चोवीस तास घरात राहून, झाली मोठी सजा।
वाट बघते आता, कोरोना तुझ्या जाण्याची,
गरीब गृहिणीची या, संपली सहनशक्ति।
- कॉ.के.के.जांबकर
0 टिप्पण्या