कोरोना माहामारी:धर्मांधता व विज्ञान...

कोरोना माहामारी:धर्मांधता व विज्ञान...
जगभरात कोव्हीड 19 कोरोना या व्हायरस ने मृत्यूचे आकांडतांडव घातले असून आजपर्यंत 1.25 लाखांपेक्षा जास्त लोकांचे मृत्यू या विषाणूजन्य आजाराने झाले आहेत व आणखी होत आहेत. जगाच्या पाठीवर आदी राज्य गाजविणारे प्रगत राष्ट्र देखील या महामारीच्या कचाट्यात अडकले असून त्यामधून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहेत. सर्वात जास्त म्रुत्यूचे थैमान घातले आहे ते जगावर राज्य करू इच्छित असणार्‍या युरोपीयन देशात यामध्ये प्रामुख्याने अमेरिका आणि फ्रान्स, इटली व ब्रिटन तसेच इतर ही छोटे मोठे राष्ट्रे आहेत जसे अरब जगातील काही देश इराण इराक पाकिस्तान. व आशिया खंडातील चीन भारत व नेपाळ. मुळातच हा कोरोना व्हायरस बलाढ्य समजल्या जाणार्‍या आपल्या शेजारील राष्ट्र चीन पासून या महामारी कोरोना संसर्गजन्य विषाणूची लागण झाली आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे इतर राष्ट्र देखील या महामारी विषाणू पासून सुरक्षित राहिले नाहीत. सध्याच्या परिस्थितीत या विषाणू ची प्रतिबंधक लस तयार होईपर्यत तरी यावर उपाय म्हणजे विलगीकरण करून साखळी तोडणे व फैलाव थांबविणे हाच शेवटचा पर्याय म्हणून पाहिले जात आहे.
अनेक राष्ट्र प्रमुखाची व राजघराण्यातील सदस्यांना देखील यामध्ये ब्रिटन ची सम्राज्ञी राणी एलिझाबेथ ही सुद्धा ह्या जीवघेण्या व्हायरस च्या सपाट्यात अडकली असून तिने सुद्धा स्वतः ला कोरोंनटाईल करून घेतले आहे. याचाच सरळ सरळ अर्थ म्हणजे ह्या कोरोना व्हायरस च्या समोर समतावादी भुमिका दिसते. गरीबी -श्रीमंती, उच्च- निच्च, काळा- गोरा, नास्तिक-आस्तीक, धार्मिक-अधार्मीक, स्त्री- पुरुष, तरूण-म्हातारे, असा भेदाभेद न करता सर्वानाच समान वागणूक देत आहे. कोरोना च्या सपाट्यात जो आला त्याला ओढलाच म्हणून समजा. सध्या तरी कोरोना मुळे लक्षात घेण्यासारखे बरेचसे घडताना पाहायला मिळत आहे. मानवाने विज्ञानाच्या आधारावर कितीही प्रगती केली असली तरीही मानवाच्या कल्याणासाठीच ती प्रगती असली पाहिजे हे आतातरी दिसून येते.मानवाच्या यांत्रिकी करणात देखील माणूस यंत्रे बनताना दिसत होते पण झाले उलटे. यावेळी माणुसकी संपत आहे म्हणताना माणूसकी जिवंत आहे हे दिसून येते. कोरोना संसर्ग झालेल्या व म्रुत्यु च्या शय्येवर तडफडत असणार्‍या सोडून रक्ताच्या नात्यातली माणसे याप्रसंगी दुर जाताना दिसत असून ज्याचे कोणीही नाही असे दुरचे माणसे मानवतावादी भुमिकाच्या माध्यमातून मदतीसाठी धावत असून प्रसंगी स्वतः चा जीव धोक्यात घालून घरातील कुंटूबांपासून दुर जाऊन मदत करीत आहेत. यामध्ये डॉक्टर, नर्सेस, आरोग्य सेवा कर्मचारी आणि इतर अनेक कर्मचारी व स्वंयसेवक सेवाभावी वृत्ती ने काम करताना दिसत आहेत.
विज्ञानाच्या युगात ही मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धा जोपासल्या जात आहेत. हे आपण पाहतोच मग त्यामध्ये राष्ट्र असो की अप्रगत, सध्यातरी कोणताही धर्म शिल्लक नव्हता की राष्ट्र, सर्वानी अंधश्रध्दा चा बाजार मांडला होता याचे कारण धार्मिक स्वार्थी मतलबी धर्मगुरू यामध्ये कोणताच धर्म मागे राहिला नाही. जगातील सर्वच धार्मिक देश जणू मरून पडले आहेत. देशातील सर्व प्रमुख मंदिर बंद करावे लागत आहेत. मक्का पासून ते वँटकिन सिटी पर्यंत आणि तिरूपती बालाजी पासून ते बुद्ध गया पर्यंत सर्वच कोरोना वायरस बंदिस्त करून घेत आहेत. म्हणजेच आपणावर संकट आले की देवी देवता कडे धाव घेत असतो पण यावेळी अनुभव वेगळाच आहे, देवाच्या मूर्तीलाच मास्क लावून पुजा करताना पुजारी दिसत आहे. भक्त आहेत म्हणून मानवाने बनविलेल्या मुर्तीला देवत्व येते नाहीतर ती मुर्तीच राहते. संकटकाळी जनता धार्मिक स्थळाकडे न जाता विज्ञानाच्या शोध कधी लागतो म्हणजे लस कधी सापडेल या कडे वळताना दिसत आहे. ख्रिश्चन धर्म गुरू पोप यांने कोरोना वायरस माझे काही बिघडत नाही म्हणणारे देखील शेवटी कोरोना वायरस मुळे म्रुत्यू मुखी पडलेले दिसलेत. असे अनेक उदाहरणे आपण सध्या पाहतोय. सध्या तरी कोरोना वायरस वर शास्त्रज्ञांनी लवकरच लस शोधून काढले पाहिजे व कायमस्वरुपी या जीवघेण्या विषाणू प्रतिबंधक केला पाहिजे असी आर्त भावना व्यक्त केल्या जात आहे. यासाठी शास्त्रज्ञांनी प्रयत्न सुरू केले असून लवकरच या वायरस वर देखील कायमस्वरूपी तोडगा काढतील यात तिळमात्र शंका नाही. यापुर्वी देखील अनेक जीवघेण्या माहामारी वर मात करण्यात आली आहे. प्लेग असो की देवी असो की अनेक माहामारी संसर्गजन्य आजार यावर इलाज काढला आहे.
आजघडीला प्रत्येक जण आपआपल्या परिने या लढ्यात सहभागी झाला आहे, कोणी आर्थिक मदत करून तर कोणी माणुसकी दाखवून कोणत्या ना कोणत्या परीने सहकार्य करीत आहेत. जगातील प्रगत राष्ट्रे देखील मदत घेण्यासाठी याचना करताना पाहायला मिळत आहे तर त्यांना देखील मदत करताना इतर देश पुढे सरसावले आहेत. यामध्ये अमेरिका सुद्धा औषधी नाहीत म्हणून भारताकडून मदतीची अपेक्षा व्यक्त करीत होता त्याच्या विनवणी स भारताने सकारात्मकता दाखवित ओषधी साठा पाठवून दिला आहे. तसेच शेजारील राष्ट्र पाकिस्तान देखील भारताने मदत करावी यासाठी वाट पाहत आहे. सांगायचं तात्पर्य एवढाच की प्रत्येक जण मदतीला धावून जात आहे. यावेळी देशावर आलेल्या संकटातून मार्ग काढण्यासाठी अनेक दानशूर लोकांनी, स्वयंसेवी संस्था, उद्योजक, व्यापारी, सरकारी नोकरदार, मंदिराच्या ट्रस्ट, दिग्गज कलाकार व खेळाडू यामध्ये सर्वच स्तरातून मदत करीत असताना आपण पाहतोय म्हणून म्हणावेसे वाटते की आणखी माणुसकी मोठ्या प्रमाणात जीवंत आहे. शेवटी संत गाडगेबाबा यांची आठवण येते कुठे ही न शिकलेल्या निरक्षर पण समाज सुधारक यांनी वेळोवेळी सांगितले आहे की बाबानो देव मंदिरात नसुन देव तुम्हा आम्हात आहे मंदिरात फक्त पुजारीच्या पोट असते,मुला बाळाना शिकवा  आणि स्वच्छतागृह बांधा, आरोग्य सुविधा देण्यात यावे यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न होता. म्हणून याप्रसंगी संकटातून बाहेर पडल्यानंतर तरी आरोग्य व शिक्षण यावर सरकारने मोठ्या प्रमाणात आर्थिक नियोजन करून खर्च वाढवायला पाहिजे. विज्ञानाच्या क्षेत्रातील अनेक पायाभूत सुविधांचा अभाव आहे तो दूर करावा हीच अपेक्षा आहे.
-प्रा.डॉ.लक्ष्मण शिंदे
सायन्स कॉलेज,नांदेड.

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]