Header Ads Widget

पाया आधी,कळस नंतर
आपल्या पूर्वजांनी बुद्धी व अनुभवाच्या आधारावर अनेक वाक्प्रचार रूढ करून ठेवलेले आहेत जे आपणा सर्वांना दैनंदिन जीवन जगत असतांना व्यवहाराचे भान ठेऊन नेहेमीच उपयोगी पडतात. सहसा आधुनिक संस्कृतीच्या युगात वर्तमान पिढीला या बाबत फारसे समजतच नाही. व्यावहारिक जीवनात त्याचा कुठे व कसा उपयोग व फायदा करून घ्यायचा असतो या बाबत तर वर्तमान पिढी अनाभिज्ञच. आमच्या सारखी जुनी मंडळी मात्र वर्तमानाला नेहेमीच त्याचे वास्तव समजावून व पटवून सांगण्याच्या नादात असतात. सर्वांनी व्यावहारिक असावे असे जुने जनमत आहे. पण जुने फेकून नवे आत्मसात करण्याच्या नादात आजची समाज रचना कार्यरत आहे. जुने जरूर फेका, पण नव्याचा स्वीकार करत असतांना वर्तमान व भविष्यासाठी जुन्याची उपयुक्तता विसरूनही चालणार नाही याची जाणीव गरजेची वाटते.
मूळ विषयाशी स्पर्श करत असतांना असे का वाटते कारण कुठलीही लहान मोठी वास्तू उभारत असतांना पायाभरणी मजबूती शिवाय इमारतीचे किंवा निर्माणाधित वास्तूचे अस्तित्वच शून्य असते. पुढे वास्तूचे जे काही महत्व व टिकाऊपण असते ते केवळ मजबूत व कुशल पायाभरणी शिवाय शक्यच नसते असे वास्तवावर आधारित समाजमत दृढ आहे. कोरोनारूपी व्हायरस पासून बचावासाठी जगभरातीलच नव्हे तर अगदी शेवटच्या टोकापासून ते शिखरापर्यंत सर्वच प्रशासकीय यंत्रणा अविरतपणे कामाला जुंपली आहे. मी जुंपली आहे असा शब्द वापरण्याचे मूळ कारण शासकीय व प्रशासकीय अशा दोन यंत्रणा कार्यरत असतात. शासकीय यंत्रणा म्हणजे निर्माणाधित वास्तूच्या शिखराचे किंवा कळसाचे काम करते, तर दुसरी पाया रुपी कार्यरत असणारी यंत्रणा निव्वळ आदेशाचे पालन करून व्यवस्था नीटनेटकी किंवा व्यवस्थित ठेवण्यापायी कार्यरत असते. या सर्व चित्रात प्रत्यक्षदर्शनी पायाभरणी साठी काम करणारी सर्वच यंत्रणा नेहेमीच दुर्लक्षित असते. समाज मनाचे लक्ष प्रथम शिखर किंवा कळसाकडेच जाते. कारण दर्शनी भाग बघण्याची सवय मानवी मनाला जडलेली आहे. सहसा पायाभरणी कडे जात नाही, पण प्रत्यक्ष व्यवहारात असे नसून जर पाया (बेसमेंट) पक्के व प्रमाणिक पणे भक्कम उभारलेले असेल तर दर्शनी इमारत व त्याच्या शिखराला महत्व आहे, अन्यथा निर्माणाधित वास्तूचे महत्व श्यूण्यचं आहे. जे फार काळ टिकत नाही, इमारत केंव्हाही ढासाळू शकते हे व्यवहारिक वास्तव सत्य आहे.
मी वास्तव या शब्दाचा पुर्नउच्चार येवढ्यासाठीच करतो की परवा इंजि. चंद्रप्रकाश देगुलकर नावाचा कोरोना भयभीत रुग्ण तपासणीसाठी नेमून दिलेल्या शासकीय रुग्णालयात गेला असता त्याची सर्वतोपरी शिखर रुपी प्रशासकीय यंत्रणेने निव्वळ अवहेलनाच केली हे अपवादात्मक सत्य असू शकते. शासनाने नेमून दिलेली ही कळस रुपी यंत्रणा पूर्णपणे निर्ढावलेल्या अवस्थेतच होती असे चित्र दिसले. उलटपक्षी कोरोना आजाराच्या बाबतीत स्वच्छतेच्या प्रश्नाबाबत महापालिकेतीलच नव्हे तर इतर विभागातील पायारूपी सर्वच स्वच्छता यंत्रणा घरोघरी जाऊन रात्रंदिवस काम करून या सेवेपायी कार्यरत असल्याचे चित्र सध्यातरी असल्यामुळे बेसमेंट स्तरावर काम करणार्‍या सर्वच कामगारांचे, अधिकार्‍यांचे मानापासू  कौतुक केल्याशिवाय राहवत नाही. हा पाया पक्का असल्यामुळे महापालिकेतील समग्र स्वच्छता यंत्रणेचे योगदान अत्यंत उपयुक्त व महत्वाचे आहे, पण याचे नेहेमीसाठी सातत्य टिकविणे हे शिखराचे काम आहे.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे म्हणतात की, पृथ्वी ही शेशाच्या मस्तकावर नसून कष्टकर्‍यांच्या तळ हातावर आहे. हे बरोबरच आहे. मंदिरात प्रवेश करत असतांना माणूस सर्वप्रथम पायरीवर डोके ठेवतो, नंतर मूर्तीकडे बघतो म्हणून जनसामन्याला माझी आग्रहाची विनंती आहे की जनमानसात वावरत असतांना आधी या समाजरूपी किंवा शासन व प्रशाकीय यंत्रणारूपी इमारतीच्या बेसमेंट लेव्हल वर आपल्या कुटुंब व जीवाची पर्वा न करता अहोरात्र काम करून आपले आरोग्य वर्धित करण्यासाठी आपणास जी सेवा देतात त्या बद्दल आपणा सर्वांनी कृतज्ञ राहणे अत्यंत गरजेचे आहे. या बेसमेंट लेवलच्या सेवा जर नसत्या तर आपण पंगू राहिलो असतो, म्हणून यांच्या सेवेला कृतज्ञतापूर्वक सलाम. म्हणूच पाया पक्का असल्याशिवाय कळसाला महत्व नाही व या जागतिक संकट समयी या सवर सेवेकर मंडळीला मानापासू धन्यवाद.
- लाल सलाम! इन्कलाब जिंदाबाद!!
- कॉ.के.के.जांबकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]