विनाकारण फिरणारे वाहने तीन महिन्यांसाठी जप्त करणार
जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांची माहिती
नांदेड/प्रतिनिधी-कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन केले असून जिल्हा प्रशासन सर्व जीवनावश्यक सेवा चालू ठेवण्यासाठी प्रयत्नशिल असतांनाही काही नागरिक विनाकारण रस्त्यांवर वाहनाद्वारे फिरत असल्याचे आढळून आले आहे. अशा प्रकारे बिनकामी फिरणारे वाहन चालकांवर गुन्हे दाखल करुन सदरील वाहने तीन महिन्यांसाठी जप्त करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर यांनी आज (गुरुवार) एका पत्रकार परिषदेत बोलतांना दिली.
पत्रकारांशी संवाद साधतांना जिल्हाधिकारी डॉ.विपिन इटनकर व जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर म्हणाले की, शहर व जिल्ह्यात बर्याच ठिकाणी मुख्य रस्ते सिल केलेले आहेत. तरीही काही नागरिक विनाकारण वाहनावर फिरुन गर्दी करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आजपासून अशा वाहन चालकांवर गुन्हे दाखल करुन त्यांची वाहने तीन महिन्यांसाठी जप्त करण्याची मोहिम आजपासून प्रशासन नाईलाजास्तव अंमलात आणत आहे. जिल्ह्यात महसूल, पोलीस, मनपा, आरोग्य विभाग, सफाई कामगार असे मिळून जवळपास दहा ते बारा हजार अधिकारी, कर्मचारी दिवसरात्र जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांना नागरिकांनी घरा बाहेर न पडता सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सध्या शहरात राज्य व जिल्ह्यातील एकूण 830 लोकं प्रशासनातर्फे उभारण्यात आलेल्या कॅम्पमध्ये असून त्या सर्वांची जेवन, पिण्याचे पाणी आदी सर्व व्यवस्था स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने प्रशासन करीत आहे. गोरगरीब वस्त्यांमध्ये शासनाच्यावतीने व स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने अन्नधान्याचे किट वाटप सुरु आहे. ज्यांना कोणाला मदत करायची आहे त्यांनी अन्नधान्याच्या किट तयार करुन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. या पत्रकार परिषदेस जिल्हा पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.सचिन खल्याळ, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधिक्षक दत्तराम राठोड, उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
======================
रामनवमी असूनही रामाचे देऊळ बंद
नांदेड/प्रतिनिधी-स्वामी समर्थ यांच्या जीवनावर आधारीत ‘देऊळबंद’ या प्रमाणे सर्वच देवांवर परिस्थिती ओढवली आहे. गुरुवार दि.2 एप्रिल रोजी रामनवमी असतांनाही नांदेड शहरातील सर्वच राम मंदिरांमध्ये अक्षरशः देऊळबंदची परिस्थिती दिसून आली.
गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात ऐतिहासिक अशा अयोध्या खटल्याचा निकाल लागला. हा निकाल रामलल्लाच्या बाजुने लागला. म्हणजे अयोध्येतील त्या संपुर्ण जागेवर रामाचे मंदिर बांधण्यास सर्वोच्च न्यायालयाने होकार दर्शवला. या पार्श्वभूमीवर यंदाची आजची रामनवमी संपुर्ण देशभर नेहमीपेक्षाही जास्त उत्साहात, जल्लोषात साजरी झाली असती. परंतु मध्येच कोरोनाचे प्रकरण उद्भवले. त्यानंतर सर्वत्र कडेकोट बंद आणि बंदोबस्ताचे वातावरण आपण अनुभवत आहोत. कोरोनाचा संसर्ग होवू नये म्हणून लोकांची गर्दी टाळण्यासाठी सरकारने उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार सर्व मंदिरे, चर्चेस, गुरुद्वारा, पार्थंनास्थळे भाविकांसाठी बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे त्या-त्या ठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून भाविक गेलेले नाहीत. त्या-त्या धार्मीक ठिकाणी त्यांच्या-त्यांच्या परंपरेनुसार रोजचे पुजापाठ, धार्मीक विधी एवढेच काय ते चालू आहे. त्या ठिकाणी त्यासाठी फक्त पुजारी किंवा धार्मीक स्थळ प्रमुखांनाच प्रवेश दिला जातो. देऊळबंद असल्यामुळे बाहेरच्या गेटमधूनच लोकांना हात जोडावे लागतात. शासनाने जमावबंदीचा आदेश देखील लागू केला आहे. त्यामुळेच पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येता येत नाही. या सर्व परिस्थितीचा परिणाम म्हणून रामनवमीच्या दिवशी फक्त पुजा, अभिषेक आणि रामजन्म यासाठी आणि फक्त पुजार्यांसाठीच राममंदिरे उघडी होती. भाविकांना प्रवेश नव्हता. नांदेड शहरातील होळी भागातील सर्वात जुने राममंदिर, चिखलवाडीतील राममंदिर, यशवंतनगरमधील राममंदिर तसेच सिडकोतील राममंदिर अशा सर्व ठिकाणी भाविकांच्या शिवाय रामनवमीचे धार्मीक कार्यक्रम पार पडले.
==============================
देगलूरनाकाःहाणामारीच्या
घटनेतील दुसर्या जखमीचा मृत्यू
नांदेड/प्रतिनिधी-देगलूरनाका भागातील मुजाहिद चौक येथे दि.25 मार्च रोजी झालेल्या हाणामारी व गोळीबाराच्या घटनेतील जखमी इसमाचा बुधवारी मृत्यू झाला आहे. या घटनेतील मृत्यू पावलेल्यांची संख्या दोन झाली असून घटनेतील प्रमुख आरोपी अजुनही फरार आहेत.
कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी सगळीकडे लॉकडाऊन व संचारबंदी लागू असतांना देगलूरनाका भागातील मुजाहिद चौकात दि.25 मार्च रोजी दुपारी दोन गटामध्ये हाणामारीची घटना घडली. घटनास्थळीच मोहंमद जुनेद या तरुणाचा मृत्यू झाला. तर शेख सिराज शेख मौला, मोहंमद हाजी,मिनाजोद्दीन हे गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी सात जणांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी मोहंमद हाफिजोद्दीन इनामदार (वय 70) यांना अटक केली. इतर सहा आरोपी फरार झाले आहेत. भांडणात चाकु, तलवारीचा वापर गोळीबार सुध्दा करण्यात आला. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारा दरम्यान बुधवारी शेख सिराज शेख मौला (वय 38) रा. हबीबीया कॉलनी, नांदेड याचा मृत्यू झाला. त्यामुळे घटनेतील मृत्यूची संख्या दोन झाली आहे. फरारी आरोपी अजुनही नांदेड ग्रामीण पोलीसांना सापडले नाहीत. गोळीबार करणारी रिव्हॉल्वरही नांदेड ग्रामीण पोलीसांनी जप्त केली नाही. एवढी मोठी घटना घडूनही या गुन्ह्याचा तपास मात्र संथगतीने सुरु आहे. काही दिवसांपासून दोन गटात अंतर्गत धुसफूस सुरु होती. त्याचे पर्यावसन हाणामारीच्या घटनेत घडले.

0 टिप्पण्या