वाईन शॉप वर फिजिकल डिस्टन्स चे नियम पाळण्यासाठी पूर्वतयारी सुरू

वाईन शॉप वर फिजिकल डिस्टन्स चे नियम पाळण्यासाठी पूर्वतयारी सुरू




































नांदेड/ प्रतिनिधी
नांदेड शहरात उद्या पासून मध्य विक्री सुरू होणार असल्याची चाहूल लागताच मद्य विक्रेत्यांनी आपापल्या दुकानासमोर फिजिकल डिस्टन्ससिंगचे नियम पाळण्यासाठी पूर्वतयारी सुरू केली आहे.वाईन शॉप समोर होणारी गर्दी लक्षात घेता फिजिकल डिस्टन्स नियमांचे काटेकोर पालन व्हावे म्हणून ग्राहकांना उभे राहण्यासाठी मार्किंग, तीन फुटाच्या अंतरासाठी दरी कटिंग अशाप्रकारच्या पूर्वतयारी नांदेड शहरातील वाईन शॉप समोर आज दुपारपासून सुरू झाले आहे.
मद्यविक्रीतून राज्य शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. या या कर स्वरूपातून आलेल्या महसुलात च्या पैशातूनच शासन विविध कल्याणकारी योजना तसेच सरकारी नोकरांचे पगार आदींवर खर्च केला जातो. कोरोना च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशव्यापी लॉक डाऊन ची.घोषणा केली.त्यामुळे सर्वात मोठी अडचण मद्यपींची झाली वाईन, देशी-विदेशी दारू, बियर अवाच्या सवा भावाने विक्री होती त्यामुळे तळीरामांनी राज्यामध्ये दारू दुकाने सुर करावीत अशी मागणी केली होती.या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 15 मे पासून राज्यात दारू विक्रीस परवानगी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये पूर्वतयारी जोमाने सुरू झाली आहे. आज दुपारपासून शहरातील विविध भागात असलेल्या दारू दुकानांसमोर फिजिकल डिस्टन्स चे नियम काटेकोरपणे पाळण्यासाठी च्यादृष्टीने दुकानांसमोर लागणाऱ्या रांगा साठी ब्यारिकेटींग, खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांना उभे राहण्यासाठी मार्किंग आदी कामे आज वाईन शॉप समोर सुरू असल्याचे चित्र पहावयास मिळाले.
Attachments area

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]