मठाधिपती साधू सह दुहेरी हत्याकांड ; नांदेड जिल्ह्यात खळबळ आरोपी अटकेत


मठाधिपती साधू सह दुहेरी हत्याकांड; नांदेड जिल्ह्यात खळबळ; आरोपिला अटक

नांदेड /प्रतिनिधी
शिव संस्कृतीचे प्रचारक आणि उमरी तालुक्यातील नागठाणा मठाचे मठाधिपती बालतपस्वी श्री गुरु निर्वाणरुद्र पशुपती  शिवाचार्य महाराजांसह मठातील आणि एकाची हत्या झाल्याची घटना रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास उमरी तालुक्यातील नागठाणा येथे घडली आहे. या दुहेरी हत्याकांड मुळे नांदेड सह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली दिली आहे.या गुन्हातील मारेकरी चे नाव स्पष्ट झाले असले तरी अद्याप तो फरार आहे.नागठाणा मठात चे भक्त आणि उमरी तालुक्यातील नागरिकांनी या हत्याकांडातील आरोपीला अटक झाल्याशिवाय मयत बाल तपस्वी श्री गुरु निर्वाण रुद्र पशुपती शिवाचार्य महाराज यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचे सांगितल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.दरम्यान या हत्याकांडाच्या निषेधार्थ आज दिवसभर उंबरी शहरातील बाजारपेठेत कडकडीत बंद पाळण्यात आला.दरम्यान आता हाती आलेल्या माहिती आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
नांदेड जिल्ह्यातील उमरी तालुक्यात असलेल्या नागठाणा या गावात शिव संस्कृती चे प्रचार आणि नागठाणा मठाचे मठाधिपती बाल तपस्वी श्री गुरु निर्वाणरुद्र पशुपती  शिवाचार्य महाराज यांचा मठ आहे.या मठाद्वारे धार्मिक कार्यासोबतच सामाजिक कार्याचे उपक्रमही राबविले जातात. शनिवारी नेहमीप्रमाणे दैनंदिन कामे आटपून शिवाचार्य महाराज आपल्या कक्षा झोपले असताना सोमनाथ लिंगडे या मठाशी संबंधित असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने मठातील महाराजांच्या पूजेसाठी असणाऱ्या सोने-चांदीच्या काही वस्तू सोन्याची अंगठी काही रोख रक्कम एका पिशवीत भरली. एवढ्यात महाराजजागे झाले. महाराजांनी त्याला विरोध केला असता सोमनाथ लिंगडे यांनी महाराजांच्या गळ्याभोवती मोबाईल चार्जर चे वायर आवळून महाराजांचा खून केला.असे प्रत्यक्षद्शींनी सांगितले.या घटनेनंतर आरोपीने सर्व वस्तू सह महाराजाची गाडी घेऊन पळून जाण्याच्या तयारीत असताना महाराजांची चार चाकी वाहन मठाच्या गेटजवळ धडकली.त्यामुळे  मोठा आवाज झाला या गोंगाटात सर्वजण उठले हे लक्षात येताच सोमनाथ लींगडे याने मठात असलेल्या एका भक्ताच्या मोटरसायकलवर पळ काढला.
दरम्यान मठातील भक्तांनी महाराजांना दवाखान्यात नेण्याचा प्रयत्न केला.परंतु डॉक्टरांनी त्यांना उपचार आधीच मृत घोषित केले.घटनेनंतर गावचे सरपंच शिवाजी पचलींग पोलीस पाटील व काही मान्यवरांनी उमरी पोलीस ठाण्यात सदरील घटनेबाबत कळविले.उमरी पोलिसांनी या घटनेची नोंद घेऊन महाराजांचे शव शववि्छेदनासाठी  शासकीय रुग्णालयात पाठवून दिले.या घटनेत दरम्यान गावातील एका वेडसर व्यक्ती चा मृत देह देखील मठाच्या मागील भागात पोलिसांना आढळून आला आह.े दोन्ही घटनांचा पंचनामा करुन पोलिसांनी आरोपी सोमनाथ लिंगडे याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

महाराजांचे सामाजिक धार्मिक आणि सामाजिक कार्य

बाल तपस्वी निर्वाणरुद्र पशुपती शिवाचार्य महाराजांनी नागठाणा गावचा पूर्ण कायापालट करून तेथे विविध उपक्रम राबवून नागरिकांसाठी सोयीसुविधा आणि शासनाच्या योजना कार्यान्वित केल्या होत्या. त्यामुळे महाराजांबद्दल केवळ वीरशैव समाजातच नव्हे तर या परिसरातील अठरापगड जाती-धर्मांमध्ये महाराजांबद्दल मोठे आदराचे स्थान होते.नुकताच त्यांनी गोशाळेचा प्रकल्प हाती घेतला होता त्यासाठी प्रशस्त असे बांधकाम केले आहे. याबरोबरच महाराजांनी मठामध्ये काही वर्षापासून अन्नछत्र देखील सुरू केले होते.आरोपी सोमनाथ लिंगडे हा नेहमी मठामध्ये असायचा,अन्नछत्रात नियमितपणे भोजन करायचा,कधीकधी मठांमध्ये मुक्कामाला देखील असत. सोमनाथ गुंड प्रवृतीचा असून त्याच्याविरुद्ध यापूर्वी  च एक खुनाचा गुन्हा दाखल झाला असल्याचे कळते.या घटनेची माहिती कळताच जिल्हा पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.

उमरी शहर कडकडीत बंद

आमचे उमरी येथील तालुका प्रतिनिधी पांडुरंग सोनकांबळे यांनी सांगितले की,या दुहेरी हत्याकांडाचा निषेधार्थ आज उमरी येथील सर्व बाजारपेठ कडकडीत बंद होती. शिवाचार्य महाराज यांच्या मारेकऱ्यांना अटक झाल्याशिवाय महाराजांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार नाहीत अशी कठोर भूमिका नागठाणा मठातील भक्तांनी घेतल्याचे सांगण्यात आले.दरम्यान आरोपीचे नाव जरी कळाले असले तरी घटना घडल्यानंतर अद्याप आरोपी पोलिसांच्या ताब्यात न आल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]