नांदेड येथील गुरुद्वारा लंगर साहिब येथे आज सकाळी वीस कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने शहर व परिसरात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्रशासनाने गुरुद्वारा परिसर, गुरुद्वारा लंगर साहेब परिसर,देना बँक,नगीना घाट रोड वरील आजूबाजूचा परिसर, बडपुरा, शहीद पुरा, राम कृष्णा टॉकीज परिसर,नगीना घाट, कनकया कंपाऊंडआदी परिसराला कंटेंटमेंट झोन म्हणून जाहीर केले आहे. हा परिसर पूर्ण सील केला आहे.या परिसरातील लोकांच्या मुक्त संचारवर बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांना आता अत्यावश्यक कामा शिवाय घरा बाहेर पडता येणार नाही.या भागा कडे जाणारे सर्व रस्ते लाकडी बेरी कटिंग लावून सील करण्यात आले आहेत. या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी जीवनावश्यक वस्तू प्रशासनाच्यावतीने पुरवल्या जाणार आहेत. गुरुद्वारा लंगर साहेब परिसरात सापडलेल्या वीस रुग्णांच्या संपर्कात आलेले व त्यांच्या नातेवाईकांना शोधून त्यांच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा,महापालिका व पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या