कोरोना ब्रेकींग न्यूज:
नांदेडात कोरोना @442;
आज 14 रुग्णांची वाढ,13 रुग्णांना सुट्टी
नांदेड/प्रतिनिधी-जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज सायंकाळी आलेल्या प्रशासकीय अहवालानुसार दिवसभरात 14 रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. तर 13 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे.
आज देगलूरनाका परिसरातील मोहसीन कॉलनी येथील 20 वर्षीय तरुण, एक 16 वर्षीय मुलगी, एक 20 वर्षीय महिला, श्यामनगर भागातील 50 वर्षीय पुरुष, श्रीनगर भागातील 49 वर्षीय पुरुष, विष्णुपूरी परिसरातील 29 वर्षीय दोन पुरुष, किनवट येथील 45 वर्षीय एक पुरुष, हिमायतनगर येथील वनारसी गल्ली 41 वर्षीय पुरुष, नायगाव येथील बोमनाळा गल्लीतील 54 वर्षीय पुरुष, मुखेड येथील तगलीन गल्ली परिसरातील 65 वर्षीय पुरुष, एक 74 वर्षीय पुरुष, देगलूर शहरातील नाथनगर मधील 35 वर्षीय पुरुष तर हिंगोली शहरातील मस्तानशहानगर भागातील 22 वर्षीय तरुण यांचे वैद्यकीय अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. आज एकूण 140 अहवाल प्राप्त झाले असून त्यापैकी 112 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 88 पॉझिटीव्ह रुग्णांपैकी एक महिला व एका पुरुषाची प्रकृती गंभीर असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. 

0 टिप्पण्या