कोरोना रुग्ण संख्येचा आलेक चढताच आज 66 रुग्णांची भर एकूण 24 रुग्ण कोरोना मुक्त दोन जणांचा मृत्यू

कोरोना रुग्ण संख्येचा आलेक चढताच आज 66 रुग्णांची भर एकूण 24 रुग्ण कोरोना मुक्त दोन जणांचा मृत्यू
कोरोना रुग्ण संख्येचा आलेख चढताच
Can increase in temperature kill coronavirus? Know the truth ...

आज 66 नवे रुग्ण दोघांचा मृत्यू 24 जन कोरोना मुक्त
नांदेड/प्रतिनिधी
गेल्या आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या दररोज चढती आहे.शनिवारी 94 सापडल्यानंतर आज रविवारी पुन्हा रुग्णांची वाढ झाली आहे.आज दोघांचा बळी घेतला तर 24 जण कोरोना मुक्त झाले आहे.
मागच्या रविवार पासून जिल्हाभरात कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे.नंडेडकरही उस्फूर्तपणे संचार बंदी च्या नियमांचे पालन करत असताना कोरोना रुग्ण संख्येचा आलेख मात्र थांबायचे नाव घेताना दिसत नाही. शनिवारी जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 94 रुग्णांची नोंद झाली होती. रविवारी एकूण 66 नवीन रुग्णांची भर पडली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज जारी करण्यात आलेल्या कोरोना वैद्यकीय अहवालात 24 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याचे नमूद करण्यात आले आहे तर उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला आहे.

आज प्राप्त झालेल्या वैद्यकीय अहवालात सर्वाधिक रुग्ण हे नांदेड शहरातील आहेत.यात विमानतळ परिसरात 65 वर्षीय महिला,श्रीनगर भागात दोन रुग्ण आढळले असून त्यात 57 वर्षीय पुरुष व 50 वर्षीय महिला, सराफा चौक 40 वर्षीय महिला,पिर्बुरहान 33 वर्षीय पुरुष ,सोमेश कॉलनी भागात अकरा रुग्ण आढळले आहे.यामध्ये 47,12, 3 ,17 ,48 वर्षीय पाच पुरुष व 37,18,10,30,65,40 वर्षाच्या महिलांचा समावेश आहे. विष्णूनगर भागात 40 वर्षीय पुरुष,शहीद पुरा भागात दोन रुग्ण आढळले असून ज्यात 10 आणि 17 वर्षाची पुरुष आहेत.

 जुना मोंढा परिसरात दोन रुग्ण आहेत यामध्ये 26 आणि 45 वर्षीय महिला,खालसा कॉलनीत 32 वर्षीय पुरुष,पाठक गल्ली सराफा नांदेड येथे दोन या दोन मध्ये 30 आणि 54 वर्षाच्या महिला आहेत.देगलूर नाका 30 वर्षीय पुरुष,माळवतकर कॉलनी जुना कौठा 53 वर्षीय पुरुष,गोविंद नगर 48 वर्षीय महिला, विष्णुपुरी 49 वर्षीय महिला, गाडीपुरा भागात दोन रुग्ण आढळले आहेत यामध्ये 55 वर्षीय पुरुष व 52 वर्षीय महिला आहे.विष्णुपुरी इंजिनिअरिंग कॉलेज परिसरात 26 वर्षीय पुरुष आहे तर बिलोली तालुक्यातील कोल्हेबोरगाव येथे साठ वर्षीय पुरुष, मुखेड तालुक्यातील खैरका दोन रुग्ण आढळले आहेत यामध्ये 55 आणि 60 वर्षांच्या दोन महिला ,मुखेड तालुक्यातील रावी येथे 71 वर्षीय पुरुष ,कंधार तालुक्यातील मानसपुरी 35 वर्षीय महिला ,फुलवळ येथे एकूण आठ रुग्ण आढळले आहेत त्यामध्ये 12,21,65 वर्षाच्या तीन पुरुष व पाच महिला 14,15,15,18 आणि 60 वर्ष आहे.हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे दोन रुग्ण आज नांदेडमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत,34 वर्षीय पुरुष व 52 वर्षीय महिला,  हिंगोली जिल्ह्यातील श्रीनगर येथे 60 वर्षीय महिला आढळली आहे.

नांदेड शहरात अँटीजेन टेस्ट घेण्यात आली होती.या टेस्ट आधारे मिलगेट भागात 65 वर्षीय पुरुष,विसावा नगर येथे 48 वर्षीय पुरुष, विष्णू कॉम्प्लेक्स येथे 62 वर्षीय महिला,शहीदपुरा भागात तीन रुग्ण आढळले आहेत.यामध्ये 17,22,55 वर्षीय महिला, बळीरामपुर भागात दोन रुग्ण ज्यामध्ये 57 वर्षीय पुरुष व 50 वर्षीय महिला आहे.गाडीपुरा भागात 52 वर्षीय महिला,आंबेडकर नगर भागात 27 वर्षीय पुरुष,विष्णुनगर भागातील टेस्टमध्ये 3 रुग्ण आढळले आहेत.त्यात 10,17 वर्षाचे दोन पुरुष व 40 वर्षाची एक महिला आहे.गाडीपुरा भागात 55 वर्षीय पुरुष,साईनगर इतवारा भागात दोन रुग्ण आढळले आहेत त्यात 20 वर्षीय पुरुष आणि 40 वर्षीय महिला आहे. पांडुरंग नगर भागात एक 53 वर्षीय महिला ,श्रीकृष्ण गंगाखेड येथे दोन रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत यामध्ये 10 वर्षीय पुरुष व 13 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

आज एकूण चोवीस रुग्णांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे. यामध्ये मुखेड सेंटर येथील 6 रुग्ण,डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील तीन रुग्ण,जिल्हा रुग्णालयातील दोन रुग्ण, पंजाब भवन येथील 13 रुग्ण असे चोवीस रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.तर देशमुख कॉलनी नांदेड येथील 65 वर्षीय महिला व परभणी जिल्ह्यातील मानवत येथील 64 वर्षीय पुरुषाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.शहराची एकूण रुग्ण संख्या 935 एवढी झाली आहे.त्यापैकी 389 पॉझिटिव्ह रुग्णांवर औषध उपचार सुरू असून त्यातील 31 रुग्णांची प्रकृती गंभीर स्वरूपाची असल्याचे वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Disqus Shortname

msora

Comments system

[blogger]